शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १५ गावांतून दाखल झाले अधिग्रहणाचे २४ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:56 IST

यंदाही अत्यंत कमी पाऊस झाल्याने नोव्हेंबर महिन्यापासूून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटत चालल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांतील विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी २२ प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : यंदाही अत्यंत कमी पाऊस झाल्याने नोव्हेंबर महिन्यापासूून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटत चालल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांतील विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी २२ प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल करण्यात आले आहेत.तालुक्यात सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस पडल्याने जमिनीतील पाणी पातळी वाढली नाही. परिणामी पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी कोरड्या पडत असल्याने ग्रामपंचायतीना अडचणी निर्माण होत आहेत. कसुरा व करपरा नदी काठावरील गावांना नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काही गावातील जलकुंभ कोरडे पडल्याने ग्रामस्थांना शेतातून पाणी आणावे लागत आहे. तालुक्यातील लाडनांद्रा, गव्हा, ढेंगळी पिंपळगाव, पार्डी कौसडी, तांदुळवाडी, शिंदे टाकळी, चिकलठाणा बु., गुळखंड, खादगाव, कन्हेरवाडी, कान्हड, जवळा जिवाजी, कुंडी, वाकी, झोडगाव या १५ ग्रामपंचायतींनी गावातील पाणी उपलब्ध असलेले २२ जलस्रोत अधिग्रहण करून गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल केले आहेत. यामधील १७ प्रस्ताव मंजूरीसाठी तहसील कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. पं.स.कडून अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसील कार्यालयात आल्यानंतर मंडळ अधिकाºयांमार्फत पाहणी करून अहवाल सादर करून मंजूरी दिली जाते. ही प्रक्रिया संथगतीने होत असल्याने अनेक दिवस अधिग्रहणाचे प्रस्ताव संबंधित विभागात मंजुरीअभावी पडून आहेत.कसुरा, करपरा : नदीकाठ तहानलेलाच४ कसुरा, करपरा नदीवर मोठा बंधारा नाही. त्यामुळे पाणी अडविण्याचे साधन नाही. पावसाचे पाणी नदीपात्रातून सरळ वाहून जात आहे.४परिणामी दोन्ही नदी काठावरील गावांना पाणीपुरवठा करणाºया विहीरी कोरड्या पडत असल्याने पाणी टंचाई निर्माण होत आहे. आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई