शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत झाली केवळ ३५०० तूर उत्पादक शेतकर्‍यांची आधारभूत खरेदी योजनेत नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 16:19 IST

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर विक्री नोंदणीसाठी जिल्ह्यातील साडे तीन हजार शेतकर्‍यांनी नाफेडकडे नोंदणी केली आहे. नवीन तूर बाजारात विक्रीसाठी आल्यानंतरही जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने तूर उत्पादकांना कवडीमोल दराने आपली तूर खाजगी बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे.

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर विक्री नोंदणीसाठी जिल्ह्यातील साडे तीन हजार शेतकर्‍यांनी नाफेडकडे नोंदणी केली आहे. नवीन तूर बाजारात विक्रीसाठी आल्यानंतरही जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने तूर उत्पादकांना कवडीमोल दराने आपली तूर खाजगी बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे.

गतवर्षी जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकर्‍यांना आपली तूर हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करताना अडचणींचा डोंगर पार करावा लागला होता. एक-एक महिना केंद्रासमोर वाहनांच्या रांगा लावून उभे रहावे लागले. ही परिस्थिती यावर्षी उद्भवू नये म्हणून राज्य शासनाने ज्या तूर उत्पादक शेतकर्‍यांना आपली तूर हमीभाव दराने खरेदी केंद्रावर विक्री करावयाची आहे, त्या शेतकर्‍यांनी आॅनलाईन प्रणालीद्वारे आपली नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. नोंदणी केल्यानंतरच त्या शेतकर्‍यांची तूर हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी केली जाणार आहे. यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांनी शेतकर्‍यांना धोका दिला आहे.

शेतकर्‍यांच्या आशा तुरीवर आहेत. खरीप हंगामाच्या शेवटी जिल्ह्यामध्ये झालेल्या समाधानकारक परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे तूर पीक चांगले जोमात आले होते. त्यातून चांगले उत्पादनही शेतकर्‍यांना होत आहे. शासनाने शेतकर्‍यांच्या तुरीचा प्रति क्विंटल ५ हजार ४५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. त्यानुसार ज्या शेतकर्‍यांना आपली तूर नाफेडच्या हमीभाव केंद्रावर विक्री करावयाची  आहे, त्या शेतकर्‍यांनी सर्वप्रथम आपापल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आॅनलाईनच्या माध्यमातून नोंदणी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, जिंतूर, परभणी, गंगाखेड, पालम, सोनपेठ या नऊ तालुक्यातील जवळपास साडे तीन हजार शेतकर्‍यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. 

आॅनलाईनचा अडथळाराज्य शासनाच्या नाफेड अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकर्‍यांनी सर्व प्रथम आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीमध्ये शेतकर्‍यांकडे असलेला तुरीचा पेरा, आधारकार्ड, सातबारा, बँकेचे पासबुक, होर्डिग्ज प्रमाणपत्र, पीक पेरा प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे सादर करावयाची आहेत. याची माहिती आॅनलाईन प्रणालीत नोंद करावयाची आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सतत सर्व्हर डाऊन होत असल्याने तूर उत्पादकांसह अधिकारी, कर्मचार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे.  

हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरु कराजिल्ह्यातील बाजारपेठेत नवीन तूर विक्रीसाठी येत आहे. परंतु, नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र अद्याप सुरु करण्यात आले नाहीत. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या प्रति क्विंटल ५ हजार ४५० रुपयांपेक्षा जवळपास १ हजार रुपये कमी दराने शेतकर्‍यांना खाजगी बाजारपेठेत तुरीची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन तत्काळ हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.