शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ७५ टक्के शाळांमध्ये चुलीवरच शिजते खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:26 IST

शहरासह तालुक्यातील सुमारे ७५ टक्के शाळांमध्ये आजही चुलीवरच खिचडी शिजत असल्याने विद्यार्थ्यांना धुराचा त्रास सहन करीत शिक्षण घ्यावे लागते. तालुक्यातील २५ टक्के शाळांमध्येच गॅस पोहोचला आहे. त्यामुळे अन्य शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): शहरासह तालुक्यातील सुमारे ७५ टक्के शाळांमध्ये आजही चुलीवरच खिचडी शिजत असल्याने विद्यार्थ्यांना धुराचा त्रास सहन करीत शिक्षण घ्यावे लागते. तालुक्यातील २५ टक्के शाळांमध्येच गॅस पोहोचला आहे. त्यामुळे अन्य शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.स्वयंपाक घरातील धुरापासून महिलांची सुटका व्हावी, त्यांना स्वच्छ इंधन मिळावे, यासाठी शासनाने उज्वला गॅस योजना सुरु केली. दारिद्र्य रेषेखालील तसेच गरीब कुटुंबांना मोफत घरगुती गॅस जोडणी देणे, हा या योजनेचा उद्देश आहे. मात्र तालुक्यातील शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खिचडी चुलीवर शिजवली जात आहे. शासनाने सुरू केलेली ही योजना शाळांतच राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात सरपणाच्या साह्याने स्वयंपाक केला जात असल्याने झाडांची मोठ्या प्रमाणात तोड केली जात होती. लाकडाच्या माध्यमातून स्वयंपाक केल्याने महिलांना धुराचा त्रास होत होता. केंद्र शासनाने २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली.धुरांपासून महिलांची मुक्तता करण्यासाठी महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस जोडण्या देण्याचा शासनाने संकल्प केला. महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, स्वयंपाकासाठी लाकडी सरपण वापरल्यामुळे लहान बालके व महिलांना होणाऱ्या श्वसनाच्या तक्रारी दूर करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे; परंतु, तालुक्यातील शाळांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून खिचडी चुलीवरच शिजत आहे. शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी महिलांची नेमणूक केलेली आहे. खिचडी करताना त्यांना धुराचा सामनाही करावा लागतो. परिणामी श्वसनाचे आजार जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे शिक्षण विभाग व राज्य सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.७३ शाळा गॅस जोडणीविनाच४सोनपेठ तालुक्यात ९८ शाळांमध्ये पोषण आहार दिला जातो. त्यापैकी फक्त २५ शाळांमध्येच गॅस उपलब्ध असून अद्याप ७३ शाळांना गॅस जोडणीची प्रतिक्षा आहे.समग्र शिक्षणाच्या समग्र अनुदानामधून व १४ व्या वित्त आयोगाच्या उपलब्ध निधीमधून शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस जोडणी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.-शौकत पठाण, गटशिक्षणाधिकारी

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळा