शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: आठ हजार लाभार्थ्यांची झाली आॅनलाईन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 23:57 IST

केंद्र शासनाने पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी ‘आवास प्लस’ मोबाईल अ‍ॅपद्वारे आॅनलाईन पद्धतीने प्रपत्र ड फॉर्म भरुन घेण्यासाठी ३० सप्टेंबरची डेडलाईन दिली होती. २९ सप्टेंबरपर्यंत ८ हजार ४४२ लाभार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. अद्यापही ६ हजार लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण करणे बाकी आहे. त्यामुळे केंद्र शासनाने आॅन लाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): केंद्र शासनाने पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी ‘आवास प्लस’ मोबाईल अ‍ॅपद्वारे आॅनलाईन पद्धतीने प्रपत्र ड फॉर्म भरुन घेण्यासाठी ३० सप्टेंबरची डेडलाईन दिली होती. २९ सप्टेंबरपर्यंत ८ हजार ४४२ लाभार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. अद्यापही ६ हजार लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण करणे बाकी आहे. त्यामुळे केंद्र शासनाने आॅन लाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.केंद्र सरकारने २०११ च्या जातनिहाय सर्व्हेक्षणाच्या आधारे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना अंमलात आणली. जिल्हा, तालुका आणि गावनिहाय लाभार्थ्यांच्या याद्या केंद्र सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. परपत्र ब मध्ये समाविष्ट असलेल्या नावाच्या आॅनलाईन प्रतीक्षा याद्या पंचयात समितीस्तरावर तयार करुन लाभार्थ्यांच्या नावासह प्रत्येक गावात अधिकाऱ्यांमार्फत छाननी करुन नावे अंतिम करण्यात आली होती. त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरु आहे; परंतु, २०११ च्या सर्व्हेक्षणमध्ये वंचित राहिलेल्या गरजू लाभार्थ्यांसाठी शासनाने प्रधानमंत्री आवास ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत प्रपत्र ड लाभार्थ्यांकडून भरुन घेण्याबाबत आदेश दिले होते. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदत दिली होती. पाथरी तालुक्यातील १४ हजार १०२ लाभार्थ्यांपैकी २९ सप्टेंबरपर्यंत ८ हजार ४४२ लाभार्थ्यांची आॅनलाईन सर्व्हेक्षण नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही तालुक्यात ४० टक्के लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण होणे बाकी आहे. त्यामुळे केंद्र शासनाने या सर्व्हेक्षणाला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.मुदतवाढीसाठी केंद्राकडे प्रस्तावप्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र ड अंतर्गत आॅनलाईन सर्व्हेक्षणासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आॅनलाईन नोंदणी करताना डाटा एंट्रीसाठी विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व डाटा आॅपरेटरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे २९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५३ टक्के आॅनलाईन नोंदणी झाली आहे. अजूनही ४७ टक्के लाभार्थ्यांचे आॅनलाईन सर्व्हेक्षण करणे बाकी आहे. केंद्र शासनाने दिलेली मुदत एका दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्य शासनाने सर्व्हेक्षणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीHomeघरCentral Governmentकेंद्र सरकार