शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :  ४०० तूर उत्पादकांची आॅनलाईन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 01:08 IST

यावर्षीच्या खरीप हंगामातील तूर हा शेतमाल खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने ५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या केंद्रांवर १२ फेब्रुवारीपर्यंत ४०० तूर उत्पादकांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामातील तूर हा शेतमाल खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने ५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या केंद्रांवर १२ फेब्रुवारीपर्यंत ४०० तूर उत्पादकांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.यावर्षी जून व जुलै या दोन महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. या पावसाच्या पाण्यावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. यामध्ये नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस, सोयाबीन, मूग, उडीद व तूर पिकाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता; परंतु, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर या तीन महिन्यात जिल्ह्यात पाऊस झाला नाही. परिणामी पाण्याअभावी खरीप हंगामातील पिके जाग्यावरच करपून गेली. ज्या शेतकºयांकडे थोेड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध होेते, त्या शेतकºयांनी पिकातून उत्पन्न घेतले; परंतु, शेतकºयांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर खाजगी व्यापाºयांनी कवडीमोल दराने या शेतमालाची खरेदी केली. दुष्काळाच्या गर्तेत सापडलेला शेतकरी व्यापाºयांच्या आडमुठ्या धोरणामुळे आर्थिक कोंडीत सापडला. शेतकºयांची परिस्थिती पाहून राज्य शासनाने जिल्ह्यात ७ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून शेतकºयांकडून सोयाबीन, मूग, उडिदाची हमीभाव दराने खरेदी केली. त्यामुळे शेतकºयांना थोडाफार दिलासा मिळाला. सध्या खरीप हंगामातील तूर हा शेतमाल सध्या बाजारपेठेत येत आहे. राज्य शासनाने तूर या पिकाला ५ हजार ६७५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे; परंतु, खाजगी बाजारपेठेत ५ हजार रुपयांपेक्षा वर तुरीची खरेदी करण्यात येत नाही. त्यामुळे तूर उत्पादक कोंडीत सापडले आहेत. तूर उत्पादकांची समस्या लक्षात घेऊन ५ फेब्रुवारीपासून राज्य शासनाने जिल्ह्यातील परभणी, सेलू, पूर्णा, पालम, पाथरी व जिंतूर या सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रांवर २३ फेब्रुवारीपर्यंत तूर उत्पादक शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी करता येणार आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत ४०० तूर उत्पादक शेतकºयांनी शेतमाल विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे.पूर्णा, सेलू केंद्रावर होईना नोंदणीजिल्ह्यात सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सहा केंद्रावर ४०० तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केली आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील ३१४ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्याच बरोबर पालम ६०, पाथरी १४, जिंतूर ११ तर पूर्णा व सेलू या दोन हमीभाव खरेदी केंद्रावर अद्यापपर्यंत एकही आॅनलाईन नोंदणी झालेली नाही. नोंदणीसाठी २३ फेबु्रवारी ही शेवटची मुदत असल्याने केवळ नोंदणीसाठी ११ दिवसच उरले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी केले आहे.गतवर्षी ७९ हजार क्विंटल तुरीची खरेदी४गतवर्षी जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांना चांगले उत्पादन मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील तूर या शेतमालाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात ७ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले होते. या केंद्रांवर राज्य शासनाने दिलेल्या मुदतीत १७ हजार तूर उत्पादकांनी ८९ हजार क्विंटल तुरीची विक्री केली होती;परंतु, यावर्षी जिल्ह्यात पाऊस न झाल्याने तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे केवळ ४०० तूर उत्पादकांनीच नोंदणी केली आहे. यातून जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकारonlineऑनलाइन