शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : एक हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ ( परभणी ) : मागील खरीप हंगामात तालुक्यातील कापूस पिकावर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेले अनुदान अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील १ हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.सोनपेठ तालुक्यातील शेतकºयांचा खरीप हंगाम हा प्रमुख आहे. या हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद ...

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : मागील खरीप हंगामात तालुक्यातील कापूस पिकावर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेले अनुदान अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील १ हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.सोनपेठ तालुक्यातील शेतकºयांचा खरीप हंगाम हा प्रमुख आहे. या हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद व कापूस ही नगदी पिके म्हणून ओळखली जातात.शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाचे उत्पादन घेणाºया शेतकºयांना घटते उत्पादन, मजुरीचा वाढलेला दर व बाजारात मिळणारा अल्पदर या समस्यांना तोंड देता देता नाकी नऊ येत आहे. त्यातच गतवर्षीच्या खरीप हंगामातील कापूस पिकावर शेंद्री बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. यामध्ये हजारो शेतकºयांचे मोठे नुकसान झाले.कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसला. त्यामुळे राज्य शासनाने या शेतकºयांना अनुदान देण्याचे जाहीर केले; परंतु, तालुक्यातील ६२ गावांपैकी विटा, वाणीसंगम, वैतागवाडी या तीन गावातील १ हजार ४७ शेतकºयांना ६० लाख २९ हजार १६० रुपयांच्या अनुदान निधीची प्रतीक्षा आहे.याबाबत तहसीलदार जीवराज डापकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोंडअळीचे अनुदान शासनाकडून प्राप्त होताच तात्काळ खात्यावर वर्ग करण्यात येईल, असे सांगितले.४९ गावांतील शेतकºयांना मिळाले अनुदानबोंडअळीने बाधित झालेल्या पहिल्या टप्प्यातील १९ गावांतील ८ हजार ८४३ शेतकºयांना ४ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. दुसºया टप्प्यात ३० गावांतील १५ हजार ८९५ शेतकºयांना बोंडअळीच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत पहिल्या व दुसºया टप्प्यात तालुक्यातील ४९ गावांतील शेतकºयांना अनुदान वाटप झाले आहे. आता तिसºया टप्प्यातील १ हजार ४७ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूस