शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

परभणी : तहसील परिसरातील आगीत जुने रेकॉर्ड झाले जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:26 IST

येथील तहसील कार्यालयाच्या आवारात पडीक अवस्थेत असलेल्या तीन खोल्यांमध्ये आग लागल्याची घटना १० डिसेंबर रोजी रात्री घडली. या आगीत २००४ च्या विधानसभा निवडणुकीचे जुने रेकॉर्ड जळून खाक झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील तहसील कार्यालयाच्या आवारात पडीक अवस्थेत असलेल्या तीन खोल्यांमध्ये आग लागल्याची घटना १० डिसेंबर रोजी रात्री घडली. या आगीत २००४ च्या विधानसभा निवडणुकीचे जुने रेकॉर्ड जळून खाक झाले आहे.तहसील कार्यालयाच्या परिसरातच जुन्या बांधकामातील तीन खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये भंगार खुर्च्या, टेबल, कपाट आणि २००४ च्या निवडणुकीत वापरलेल्या पेट्या ठेवल्या होत्या. सोमवारी रात्री बारा वाजेनंतर या खोल्यांना आग लागली. दरम्यान, बघता-बघता ही आग वाढत गेली. पोलीस नियंत्रण कक्षातून अग्नीशमन दलाला रात्री २.११ वाजण्याच्या सुमारास आगीची माहिती देण्यात आली. अग्नीशमन दलाचे सचिन राठोड, मदन राठोड, वाहनचालक शेख मौला आदींनी घटनास्थळी दाखल होऊन दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान, जुन्या असलेल्या या तीनही खोल्यांमध्ये वीज प्रवाह नाही. या खोल्या वापरात नाहीत. असे असताना आग नेमकी लागली कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे. या घटनेत या खोल्यांमधील फर्निचर, कागदपत्र जळून खाक झाल्याचे दिसून आले.दरम्यान, या संदर्भात तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, या तीन खोल्यांमध्ये वीजप्रवाह नव्हता. त्यामुळे आग लागण्याचे कारणच नाही. घडलेली घटना दुदैर्वी आहे. या प्रकरणी पंचनामा केला असून, त्यात २००४ च्या निवडणुकीतील वापरात नसलेले जुने कागदपत्र जळाले आहेत. या संदर्भात रितसर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग