शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

परभणी: आॅनलाईन पद्धतीद्वारे आता कामांना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:37 IST

केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या मान्यतेसाठी आता सेक्युर सॉफ्टवेअर ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सहा- सहा महिने लालफितीत अडकणाऱ्या व मंजुरीच्या प्रतीक्षेत राहणाऱ्या लाभार्थ्यांच्या फाईलचा आता वेळेत निपटारा होण्यास मदत मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या मान्यतेसाठी आता सेक्युर सॉफ्टवेअर ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सहा- सहा महिने लालफितीत अडकणाऱ्या व मंजुरीच्या प्रतीक्षेत राहणाऱ्या लाभार्थ्यांच्या फाईलचा आता वेळेत निपटारा होण्यास मदत मिळणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची राज्यात २००८ पासून अंमलबजावणी केली जात आहे. मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा व ग्रामपंचायत या दोन यंत्रणेमार्फत कामे केली जातात. यंत्रणास्तरावरील कामांची अंमलबजावणी तहसील कार्यालयामार्फत तर ग्रामपंचायतस्तरावरील कामांची अंमलबजावणी पंचायत समितीमार्फत केली जाते. २०१० पासून मनरेगाच्या कामांना थेट मान्यता देताना गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांना मान्यतेचे अधिकार देण्यात आले होते. दरवर्षी ग्रामसभेच्या माध्यमातून गावनिहाय लेबर बजेट तयार करुन आराखडे तयार केले जातात. आराखड्यातील समाविष्ट कामांना मान्यता देण्याची प्रक्रिया राबविली जाते. गावातील मजुरांच्या मागणीनुसार गावात विविध कामांचा सेल्फ तयार करुन कामे उपलब्ध केली जातात. त्यासाठी गाव पातळीवर ४०:६० चे कुशल आणि अकुशल असे प्रमाण बंधनकारक केले आहे. ६० टक्के मजुरी आणि ४० टक्के साहित्यावर खर्च अपेक्षित आहे.मनरेगा योजनेंतर्गत कामांना मान्यता देताना केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्य शासनाने अनेक बदल केले. ग्रामपंचायतस्तरावरुन आलेल्या प्रस्तावांना मान्यता देताना छाननी समितीची मान्यता ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त मान्यतेने वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या किमान सहा महिने ते वर्षभर कालावधी लागत असल्याचा अनुभव आहे.शासनाने मागील काही वर्षात मजुरांचे ई- मस्टर आॅनलाईन करुन मजुरी ही थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे योजनांच्या कामांची मजुरी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होऊ लागली आहे; परंतु, लाभार्थ्यांना एखाद्या कामासाठी मंजुरी मिळण्यासाठी एक-एक वर्ष वाट पहावी लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावर उपाय म्हणून मनरेगा योजनेंतर्गत आता कामांना मान्यता प्रदान करण्यासाठी शासनाने २०१९-२० या वर्षापासून नवीन सेक्युर सॉफ्टवेअर प्रणालीची अंमलबजावणी सुरु केली आहे. पंचायत समितीच्या शाखा अभियंता कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या कामांच्या अंदाजपत्रक आणि प्रस्तावाची प्रकरणे आॅनलाईन पद्धतीने मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. चालू आर्थिक वर्षापासून नवीन प्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत नागपूर येथील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे आयुक्त यांनी नुकतेच आदेश काढले आहेत.शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी नवीन प्रणाली लागू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्या लॉगिनसाठी नोंदणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता पुढील कार्यवाही सुरु होईल.-बी.टी.बायस, गटविकास अधिकारी, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीgram panchayatग्राम पंचायतState Governmentराज्य सरकार