शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

परभणी: चार तलाठ्यांसह एका शिक्षकास नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 23:24 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी कार्यक्रमात गैरहजर असलेल्या चार तलाठी आणि एका शिक्षकाला जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी कार्यक्रमात गैरहजर असलेल्या चार तलाठी आणि एका शिक्षकाला जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे़ त्याचवेळी प्रशासकीय यंत्रणाही या निवडणुकीच्या तयारीत गुंतली आहे़ त्यामध्ये परभणी जिल्ह्यात निवडणुकीच्या पूर्व तयारीचा भाग म्हणून शहरातील कल्याण मंडपम् येथे ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सुरू करण्यात आली आहे़ परभणी जिल्ह्यात असलेल्या जिंतूर, परभणी, गंगाखेड व पाथरी या चार विधानसभा मतदार संघात १ हजार ५०८ मतदान केंद्र राहणार आहेत़ या मतदान केंद्रांवर २ हजार १७० बॅलेट युनिट आणि १ हजार ६८० कंट्रोल युनिट लागणार आहेत़ तर १ हजार ८४० व्हीव्हीपॅट यंत्र आवश्यक राहणार आहेत़ हे यंत्र तामिळनाडूतील चेन्नई आणि धर्मापूर येथील प्राप्त होणार आहेत़कल्याण मंडमप् येथील सभागृहात ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ यामध्ये उपजिल्हाधिकारी सुकेशिनी पगारे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हे प्रथमस्तरीय तपासणीसाठी उपस्थित आहेत़ या प्रथमस्तरीय तपासणी कामासाठी ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़ त्यातील सेलू येथील तलाठी अशोक भंवर, आऱआऱ वाव्हळे, भारत ढवळे, सेलू येथील प्राथमिक शिक्षक एम़व्ही़ चोकनपुरे आणि गंगाखेड येथील तलाठी गजानन फड हे कर्मचारी अनुपस्थित राहिले़ या पाचही कर्मचाºयांना जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़राजकीय पक्षांना उपस्थितीचे आवाहनच्शहरातील कल्याण मंडमप् येथे ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी सुरू आहे़ ही प्रथमस्तरीय तपासणी पारदर्शकरित्या सुरू आहे़ या तपासणीस जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हधिकारी पी़ शिवशंकर यांनी केले आहे़च्भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रथमस्तरीय तपासणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ त्याचवेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे़ या ठिकाणी अग्नीशमन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली असल्याचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांनी सांगितले़च्प्रथमस्तरीय तपासणीस निवडणूक विभागाने जवळपास ९० कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे़ ही प्रक्रिया आणखी २० ते २२ दिवस चालणार आहे़ प्रथमस्तरीय तपासणीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी या ईव्हीएम मशीन त्या त्या निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या ताब्यात दिल्या जाणार आहेत़ तेथून रँडमायझेशनद्वारे मतदान केंद्रांवर ईव्हीएम पोहचविल्या जाणार आहेत़भाजपा, ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी दिली भेटच्ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी सुरू आहे़ या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भेट देवून प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रिया समजावून घेतली़ इतर पक्षांनीही प्रक्रिया समजून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीEVM Machineएव्हीएम मशीनElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019