शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ५०० ऐवजी निघाली १० रुपयांची नोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:31 IST

एटीएम मशीनमधून १० हजार रुपये काढण्यासाठी मशीनवर संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर मिळालेल्या नोटांमध्ये ५०० रुपयांऐवजी चक्क १० रुपयांची एक नोट मशीनमधून बाहेर पडली़ त्यामुळे १० हजारांऐवजी केवळ ९ हजार ५१० रुपयेच ग्राहकाच्या हाती पडल्याचा प्रकार गंगाखेड शहरात १६ मे रोजी घडला आहे़

अन्वर लिंबेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : एटीएम मशीनमधून १० हजार रुपये काढण्यासाठी मशीनवर संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर मिळालेल्या नोटांमध्ये ५०० रुपयांऐवजी चक्क १० रुपयांची एक नोट मशीनमधून बाहेर पडली़ त्यामुळे १० हजारांऐवजी केवळ ९ हजार ५१० रुपयेच ग्राहकाच्या हाती पडल्याचा प्रकार गंगाखेड शहरात १६ मे रोजी घडला आहे़केंद्र शासनाने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत़ रोकड रहित व्यवहारावर भर देताना आॅनलाईन व्यवहारादरम्यान, पैसे संबंधितांना न पोहोचण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत़खाते क्रमांक अथवा बँकेचा आयएफसी कोड बदलल्याने तिसऱ्याच्याच खात्यावर पैसे गेल्याचे प्रकार यापूर्वी ऐकिवात होते़ आता मात्र एटीएम मशीनही मागितलेल्या रकमेऐवजी कमी रक्कम देत असल्याचा प्रकार गंगाखेडमध्ये घडला आहे़ गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथील गोविंद तुकाराम राठोड हे १६ मे रोजी गंगाखेड शहरातील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम केंद्रामध्ये पैसे काढण्यासाठी गेले़ त्यांना १० हजार रुपये खात्यातून काढायचे होते़ त्यामुळे त्यांनी एटीएम मशीनमध्ये कार्ड स्वॅप करून १० हजार रुपयांचे विड्रॉल टाकण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली़ त्यानंतर गोविंद राठोड यांना मशीनमधून २० नोटा मिळाल्या़ त्यात ५०० रुपयांच्या १९ आणि १० रुपयांच्या एका नोटेचा समावेश होता़ विशेष म्हणजे एटीएम मशीनमधून केवळ १०० रुपयांच्या वरील नोटाच मिळतात; परंतु, ५०० रुपयांच्या नोटेत १० रुपयांची एक नोट मिळाल्याने राठोड यांच्या हातात १० हजारांऐवजी ९ हजार ५१० रुपये पडले़ हा प्रकार घडल्यानंतर गोविंद राठोड यांनी भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीatmएटीएम