शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ नगरसेवकांचे राजीनामे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:42 IST

येथील महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य पदावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला असून जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी परस्पर पक्षाशी संबंधित नसलेल्या व्यक्तीचा अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून १८ पैकी १३ नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांच्याकडे राजीनामे दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य पदावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला असून जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी परस्पर पक्षाशी संबंधित नसलेल्या व्यक्तीचा अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून १८ पैकी १३ नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांच्याकडे राजीनामे दिले आहेत.महानगरपालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वीकृत सदस्य अ‍ॅड. विष्णू नवले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या एका जागेसाठी मनपा प्रशासनाच्या वतीने २९ जानेवारीपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनपातील गटनेते जलालोद्दीन काजी यांच्या नेतृत्वाखाली काही सदस्यांनी मंगळवारी अतिक इनामदार यांचा स्वीकृत पदासाठी मनपा आयुक्तांकडे अर्ज दाखल केला होता. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये वादावादी सुरु झाली आहे. या संदर्भात १ फेब्रुवारी रोजी पक्षाचे नगरसेवक बालासाहेब बुलबुले, चॉंद सुभाना जाकेर खान, अमरिका बेगम अब्दुल समद, विकास लंगोटे, संगिता दुधगावकर, अली खान मोईन खान, वर्षा खिल्लारे, शेख फहेद शेख हमीद, आबेदाबी सय्यद अहेमद, अमोल पाथरीकर, शेख आलिया अंजूम, मो. गौस, नाजेमा बेगम शेख अब्दुल रहीम या १३ नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांच्याकडे राजीनामे दिले. याबाबत अ‍ॅड.परिहार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी विश्वासात न घेता गटनेते जलालोद्दीन काजी यांच्या सहीने अतिक इनामदार यांचा अर्ज भरला. जे की राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नव्हते. नगरसेवकांना विचारात घेऊन उमेदवार दिला जात नसेल तर पक्षात राहून काय उपयोग, असेही या संदर्भात निवेदनात या नगरसेवकांनी नमूद केले आहे. त्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. परिहार, मनपातील विरोधी पक्षनेते विजय जामकर यांच्यासह नगरसेवकांनी मनपा आयुक्त रमेश पवार यांना स्वीकृत सदस्य पदासाठी दिलेले नाव रद्द करावे, असे निवेदन दिले आहे. त्यामध्ये अ‍ॅड.विष्णू नवले यांच्या पत्नी प्रणिता नवले यांना स्वीकृत सदस्यपदी नियुक्त करण्याचा निर्णय पक्षाच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता; परंतु, तसे न होता मनमानी पद्धतीने दुसराच अर्ज भरण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटनेत्याने दिलेले नाव विचारात घेऊ नये, असेही निवेदनात म्हटले आहे. असेच स्वतंत्र निवेदन शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.परिहार यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.अ‍ॅड.विष्णू नवले यांच्या पत्नींना स्वीकृत सदस्यपदाची उमेदवारी देण्याचा गुरुवारी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता; परंतु, २९ रोजी परस्पर उमेदवारी बदलली गेली. त्यामुळे आ.दुर्राणी यांच्या निर्णयाच्या विरोधात १३ नगरसेवकांनी आपल्याकडे राजीनामे दिले आहेत. याबाबत आपण लवकरच माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही बाब घालणार आहे.-अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार, शहर जिल्हाध्यक्षअ‍ॅड.विष्णू नवले यांच्या पत्नी प्रणिता नवले यांनाच स्वीकृत सदस्यपदाची उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले होते; परंतु, त्यांनीच राजकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे अतिक इनामदार यांचे नाव सूचविले होते. त्यानुसार इनामदार यांचा स्वीकृत सदस्यपदासाठी गटनेते जलालोद्दीन काजी यांनी अर्ज दाखल केला होता. यामागे कोणालाही डावलण्याचा किंवा मनमानीचा उद्देश नव्हता.-आ.बाबाजानी दुर्राणी, जिल्हाध्यक्ष राकॉं

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस