शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वर्षभरातच राष्टÑीय महामार्ग खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:37 IST

राष्टÑीय महामार्गाचा दर्जा असलेल्या ढालेगाव-पाथरी या रस्त्याचे काम पूर्ण होऊन एक वर्ष होत आहे. वर्षभरातच ढालेगाव जवळ राष्टÑीय महामार्गाचा रस्ता अनेक ठिकाणी खचला गेला असून वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): राष्टÑीय महामार्गाचा दर्जा असलेल्या ढालेगाव-पाथरी या रस्त्याचे काम पूर्ण होऊन एक वर्ष होत आहे. वर्षभरातच ढालेगाव जवळ राष्टÑीय महामार्गाचा रस्ता अनेक ठिकाणी खचला गेला असून वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कल्याण ते निर्मल राष्टÑीय महामार्ग २२२ हा पाथर्डी मार्गे बीड जिल्ह्यातील गढी, माजलगाव, पाथरी व परभणी असा जातो. पाथरी तालुक्यातील ढालेगावपासून सुरू होणाऱ्या रस्त्याचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र ढालेगाव येथील गोदावरी पात्रात असलेल्या पुलाचे बांधकाम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूने भराव भरण्याचे काम संथगतीने सुरू आहे. ढालेगाव ते पाथरी ८ कि.मी.चे अंतर असून राष्टÑीय महामार्गावर ढालेगावच्या नजीक वर्षभरातच रस्त्याची वाट लागली आहे. हा रस्ता अनेक ठिकाणी खचला गेला आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. त्याचबरोबर ढालेगाव नजीक रस्त्याच्या बाजूने खोदण्यात आलेल्या नाल्यामुळे गतवर्षी या भागात पावसाचे पाणी साचून बाजूच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.नाल्यातील पाण्याला उतार नसल्याने हा रस्ता खचला गेला आहे. राष्टÑीय महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडे पाच वर्ष असली तरी खचलेल्या रस्त्यावर अद्यापही दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. खचलेल्या रस्त्यामुळे या भागात वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. राष्टÑीय महामार्गाच्या अधिकाºयांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.ठेकेदार झाले गायब४राष्टÑीय महामार्गावर ढालेगाव ते मानवत रोड रेल्वेस्टेशनपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे. मानवतरोड ते परभणीपर्यंत जाणाºया रस्त्यावर हैदराबाद येथील नवीन एजन्सीला काम देण्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खड्डे खोदण्यात आले. काही ठिकाणी भराव भरण्यात आला.४गेल्या दोन महिन्यापासून तर या रस्त्यावरील काम पूर्णत: बंद करून ठेकेदार गायब झाला आहे. पर्यायाने पाथरीपासून मानवतरोडपर्यंत १८ कि.मी. अंतरापर्यंत रस्ता पूर्ण झाला. मात्र पुढील २५ कि.मी. रस्ता खराब असल्याने या रस्त्यावरून रहदारी करणे जिकीरीचे बनले आहे.४दरम्यान, राष्टÑीय महामार्ग असलेल्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम झाल्यानंतर वर्षभरातच हा रस्ता दबला गेला आहे. या रस्त्याचे काम होत असताना संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करणाºया संबंधित गुत्तेदार, अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्ग