शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

परभणी महापालिका : कचऱ्यापासून १० टन बायोगॅस निर्मिती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 23:26 IST

शहरातून दररोज उचलल्या जाणाºया कचºयातून दहा टन बायोगॅस उत्पादित करण्याचा प्रकल्प महापालिकेकडून बोरवंड परिसरात उभारला जात असून, सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता मनपाने वर्तविली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातून दररोज उचलल्या जाणाºया कचºयातून दहा टन बायोगॅस उत्पादित करण्याचा प्रकल्प महापालिकेकडून बोरवंड परिसरात उभारला जात असून, सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता मनपाने वर्तविली़परभणी शहरातील कचºयाची समस्या मागील अनेक दिवसांपासून सतावत आहे़ सध्या शहरातून जमा केलेला कचरा धाररोड परिसरातील डम्पिंग ग्राऊंडवर साठविला जात आहे़ या ठिकाणी छोटेखानी खतनिर्मिती प्रकल्प असला तरी इतर कचºयाची विल्हेवाट लावताना मात्र महापालिकेसमोर अडचणी निर्माण होत आहेत़ शहराचा विस्तार वाढत चालला असून, धाररोड डम्पिंग ग्राऊंडवर टाकलेला कचरा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे़ या कचºयाची दुर्गंधी दूर अंतरापर्यंत पोहचते़ तसेच कचरा कुजून वातावरणही प्रदूषित होत आहे़ ८ ते १० वर्षापूर्वी या भागात वसाहती नसल्याने कचºयाची समस्या निर्माण झाली नव्हती़ मात्र आता या परिसरात नव्याने वसाहतींची निर्मिती झाली आहे़ त्यामुळे कचºयाचे विघटन करण्यासाठी नवीन जागा शोधणे आवश्यक होते़या पार्श्वभूमीवर गंगाखेड रस्त्यावर परभणी शहरापासून ८ ते १० किमी अंतरावर महापालिकेने बोरवंड शिवारात ६ एकर जागा घेतली असून, या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला जात आहे़ मागील वर्षी औरंगाबाद येथील कचºयाचा प्रश्न राज्यभर गाजल्यानंतर शासनाने सर्व महापालिकांना घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ परभणी महापालिकेने १८ कोटी रुपयांचा प्रकल्प तयार केला असून, त्यास राज्य शासनाने मान्यताही दिली आहे़ विशेष म्हणजे या प्रकल्पांतर्गत बोरवंड शिवारात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे़ सध्या शहरातून निर्माण होणाºया कचºयाचे विलगीकरण केले जाते़ ओल्या कचºयापासून खताची निर्मिती आणि इतर कचºयापासून बायोगॅस निर्मिती करण्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे़ पुणे येथील उर्जा बायोसिस्टीम कंपनीने बोरवंड शिवारात ५ टन बायोगॅस निर्माण करणारे दोन प्रकल्प उभारले आहेत़ त्यामुळे शहरातील कचºयातून दररोज १० टन बायोगॅस उत्पादित होणार आहे़ सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होईल़ या शिवाय ओल्या कचºयापासून खताची निर्मिती केली जात आहे़ मात्र हा खत शेतीसाठी उपयोगी आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी याच परिसरात प्रयोगशाळाही उभारली जाणार आहे़ त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शहरातील कचºयाची समस्या मार्गी लागणार आहे़शहरात दररोज १२५ टन कचºयाचे संकलनच्परभणी शहरात घंटागाड्यांच्या माध्यमातून दररोज सुमारे १२५ टन कचरा संकलित केला जातो़ महापालिकेने कचरा संकलनासाठी कंत्राटी तत्त्वावर एका संस्थेला काम दिले आहे़ या संस्थेकडे ७५ घंटागाड्या असून, या घंटागाड्या दररोज दोन टप्प्यात वसाहतींमध्ये फिरविल्या जातात़च्घंटागाड्यांमध्येच कचरा विलगीकरण करून जमा केला जातो़ त्यात साधारणत: २५ ते ३० टन कचरा हा ओला असतो़ या ओल्या कचºयापासून धाररोड परिसरात सद्यस्थितीला खताची निर्मिती केली जात आहे़ मात्र उर्वरित सुमारे १०० टन कचºयाचे करायचे काय, असा प्रश्न मनपासमोर असून, या कचºयापासून बायोगॅस तयार करण्याचा प्रकल्प उभारला जात आहे़च्त्यामुळे सध्या तरी १०० टन कचरा धार रोड परिसरात कुजत असून, आगामी काही दिवसांत बोरवंड येथील प्रकल्प सुरू झाल्यास या कचºयाचीही विल्हेवाट लागणार आहे़आयुक्तांनी केली पाहणीच्महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी दोन दिवसांपूर्वी या प्रकल्पाला भेट देऊन कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.च्प्रकल्पाच्या चारही बाजूने वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना पवार यांनी यावेळी दिल्या. यावेळी शाखा अभियंता मिर्झा तन्वीर बेग, एजन्सीचे प्रतिनिधी प्रदीप जाधव, कुंदन देशमुख यांची उपस्थिती होती.२ किलो वॅट विजेची निर्मितीबायोगॅस प्रकल्पातून निर्माण झालेल्या गॅसच्या माध्यमातून दररोज २ किलो वॅट विजेची निर्मिती होणार आहे़ बोरवंड येथील सहा एकरच्या परिसरात कचºयाचे विघटन करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आले आहेत़ त्यासाठी दररोज साधारणत: २०० किलोवॅट वीज मनपाला लागणार आहे़ त्यापैकी २ किलो वॅट वीज बायोगॅसमधून उपलब्ध होणार असून, उर्वरित विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी सोलार प्रकल्प उभारण्याचा मानस आयुक्त रमेश पवार यांनी व्यक्त केला़ बोरवंड येथील प्रकल्पावर सोलार प्लांट उभारून उर्वरित विजेची निर्मिती केली जाणार आहे़ त्यामुळे बायोगॅस, खत आणि वीज निर्मिती करणारा हा प्रकल्प इतर शहरांसाठी आदर्श ठरणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMuncipal Corporationनगर पालिका