शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

परभणी महापालिका: तीन महिन्यांपासून मिळेना वेतन ; साडेनऊशे कर्मचारी पगारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:41 IST

महानगरपालिकेतील ९५० अधिकारी आणि कर्मचाºयांचा तीन महिन्यांचा पगार थकल्याने या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. महापालिकेचे सहाय्यक अनुदान बंद झाल्यानंतर प्रथमच तीन महिन्यांपर्यंत पगार झाला नसल्याने कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेतील ९५० अधिकारी आणि कर्मचाºयांचा तीन महिन्यांचा पगार थकल्याने या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. महापालिकेचे सहाय्यक अनुदान बंद झाल्यानंतर प्रथमच तीन महिन्यांपर्यंत पगार झाला नसल्याने कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.परभणी नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर मनपातील अधिकारी- कर्मचाºयांच्या पगारापोटी शासनाकडून मिळत असलेले अनुदान बंद झाले होते; परंतु, नव्याने निर्मिती झालेल्या महापालिकेतील उत्पन्नाचे स्त्रोत कमी असल्याने शासनाने वेतनापोटी दिले जाणारे सहाय्यक अनुदान सुरु ठेवले होते. एक वर्षापूर्वी हे सहाय्यक अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मनपाच्या अधिकारी- कर्मचाºयांच्या पगारासाठी उत्पन्नातूनच तरतूद करावी लागणार आहे. परभणी महापालिकेची आर्थिक स्थिती सुरुवातीपासूनच नाजूक आहे. अजूनही मनपाचे उत्पन्न वाढलेले नसून घरपट्टी आणि नळपट्टीतून मिळणाºया वसुलीवरच कारभार चालवावा लागत आहे.महानगरपालिकेत स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, वीज, लेखा, प्रशासकीय, वसुली असे एकूण ३६ विभाग कार्यरत असून या विभागामध्ये ९५० अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. या कर्मचाºयांना महापालिकेच्या उत्पन्नातून वेतन अदा केले जाते. सहाय्यक अनुदान बंद झाल्यानंतर साधारणत: ७ महिन्यांचा कालावधी व्यवस्थित चालला. मात्र आता वेतनासाठी महापालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातूनच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे वेतन कर्मचाºयांना मिळालेले नाही. विना वेतन अधिकारी, कर्मचारी तीन महिन्यांपासून काम करीत आहेत. ही बाब लक्षात घेता महापालिकेने अधिकारी- कर्मचाºयांच्या वेतनाची तरतूद करुन त्यांचे वेतन नियमित करावे, अशी मागणी होत आहे.सफाई कामगार आंदोलनाच्या पवित्र्यातवेतनाच्या प्रश्नावर महापालिकेतील सफाई कामगार आक्रमक झाले असून ५ फेब्रुवारीपर्यंत पगार न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा सफाई कामगार संघटनेने दिला आहे. तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बँकांचे हप्ते थकल्याने मानसिक ताण वाढत आहे. तेव्हा पगार अदा करावा, अशी मागणी परभणी शहर महानगरपालिका सफाई कामगार संघटनेच्या अध्यक्षा अनुसयाबाई जोगदंड, के.के. भारसाखळे यांनी केली आहे.एलबीटी बंद झाल्याने परिणाम४महानगरपालिकेला स्थानिक संस्थाकराच्या माध्यमातून महिन्याकाठी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत होते. त्यामुळे स्थानिक संस्था कर मनपाला आधार बनला होता. मात्र हा कर रद्द झाला आहे. त्यामुळे मनपाचे उत्पन्नाचे साधनच बंद पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील कर वसुली व्यतिरिक्त महापालिकेकडे वेगळे उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे मनपाने स्वत:चे उत्पन्न वाढविणे हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे.वेतनासाठी सव्वा दोन कोटींची आवश्यकतामहापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या वेतनावर प्रत्येक महिन्याला २ कोटी ३० लाख रुपयांचा खर्च होतो. त्यामुळे महापालिकेला प्रति माह किमान अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. मनपाकडे सध्या घरपट्टी, नळपट्टी, दुकान भाडे या व्यतिरिक्त उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही. महापालिकेने संपूर्ण १०० टक्के वसुली केली तरी महिन्याकाठी साडे तीन कोटी रुपये मनपाच्या खात्यात जमा होता. मात्र प्रत्यक्षात १०० टक्के वसुली होत नाही. तसेच थकबाकीही मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीला ५० ते ६० टक्क्यापर्यंत वसुली होत असून त्यातून १ कोटी रुपयापर्यंतची रक्कम महापालिकेच्या खात्यात जमा होत आहे. त्यामुळे मनपातील कर्मचाºयांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.