शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परभणी महापालिका :शहरातील कचरा विघटन प्रकल्पाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:09 IST

शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी प्रस्तावित असलेल्या बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्पास प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने हा प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या सहा महिन्यांमध्ये बोरवंड येथे प्रकल्पास प्रारंभ होईल, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी प्रस्तावित असलेल्या बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्पास प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने हा प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या सहा महिन्यांमध्ये बोरवंड येथे प्रकल्पास प्रारंभ होईल, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली़परभणी शहरात जमा होणारा कचरा सद्यस्थितीला धार रोडवरील डम्पींग ग्राऊंडवर टाकला जातो़ मागील काही वर्षांपासून याच ठिकाणी कचºयाची साठवणूक केली जाते़ धार रोड भागात नागरी वसाहती वाढत असून, या ठिकाणच्या कचºयाचा प्रकल्प शहरापासून दूर अंतरावर नेणे गरजेचे झाले होते़ धार रोड परिसरातील डम्पींग ग्राऊंड बंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती़ या सर्व पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शहरापासून साधारणत: ८ ते १० किमी अंतरावर असलेल्या गंगाखेड रोडवरील बोरवंड शिवारात सहा एकर जमिनीवर कचºयाचा विघटन प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला़ या ठिकाणी कचरा विघटन प्रकल्प सुरू करण्यासाठी विविध विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक होते़ काही दिवसांपूर्वी प्रदूषण महामंडळाचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़परभणी शहरातील कचºयाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या ठिकाणी कचºयापासून खत, बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. शहरात निर्माण होणारा दररोजचा कचरा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करणे, या कचºयाचा पुनर्वापर करणे या कामांना प्राधान्य देत प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. विविध विभागांच्या नाहरक परवानग्यांमुळे सध्या या ठिकाणी काम सुरू झाले नव्हते. मात्र प्रदुषण महामंडळाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्याने आता प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे.येत्या काही महिन्यांमध्येच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असून, परभणी शहरात जमा होणाºया कचºयाचे योग्य विघटन होवून मनपाला आर्थिक उत्पन्नही प्राप्त होण्याची आशा निर्माण झाली आहे़१०० टन कचºयाचे शहरात संकलन४परभणी शहरातील कचºयाचे संकलन करण्यासाठी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या असून, या घंटागाड्यांच्या माध्यमातून दररोज १०० टन कचरा संकलित केला जात आहे़४सध्या हा कचरा धार रोडवरील डम्पींग ग्राऊंडवर टाकण्यात येत असून, त्यापैकी ३५ टक्के कचरा विलगीकरण करून प्राप्त होतो़ शहरातील घंटागाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, ६९ जुन्या घंटागाड्यांसह नवीन १२ घंटागाड्यांची त्यात भर पडली आहे़४या घंटागाड्यांना स्वतंत्र मार्ग आखून देण्यात आले आहेत़ त्यामुळे मागील काही वर्षांच्या तुलनेत घंटागाड्या नियमितपणे फिरत असलयाचे दिसत आहे़बायोगॅस प्रकल्पाची : होणार उभारणी४बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्पाच्या ठिकाणी कचºयातून बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे़ यासाठी ५ टनाचे दोन प्रकल्प या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आले आहेत़ तसेच मेकॅनिकल कम्पोस्टींग खत तयार करण्याचाही प्रस्ताव आहे़ बोरवंड परिसरात हा प्रकल्प उभारण्यासाठी सुरुवातीला शहरातूनच कचरा विघटन करून नेणे गरजेचे आहे. त्यामुळे कचरा संकलन करतानाच तो वर्गीकरण करुनच संकलन करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.सद्यस्थितीत कचºयाचे विघटन होत नसले तरी लवकरच या अनुषंगाने जनजागृती करून बोरवंड येथे ओला, सुका कचरा आणि इलेक्ट्रॉनिक कचरा, प्लास्टिक वेगवेगळ्या पद्धतीने साठविले जाणार आहे़बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्प हा पर्यावरणपूरक असावा, यावर भर आहे़ त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाला थिक फॉरेस्ट (झाडांचा वेढा) असलेले संरक्षक कुंपन नैसर्गिकरित्या तयार केले जाणार आहे़ जेणे करून या प्रकल्पामधील कचºयाची दुर्गंधी प्रकल्पाबाहेर येणार नाही, यासाठी प्रयत्न आहेत़ येत्या सहा ते सात महिन्यांत प्रत्यक्ष प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करू़-रमेश पवार, आयुक्त, मनपा

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न