शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी महानगरपालिका : दलित वस्ती योजनेंतर्गत ७ कोटी रुपयांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:03 IST

नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत परभणी महानगरपालिकेने जिल्हा प्रशासनाकडे तीन वर्षांतील १२ कोटी रुपयांच्या खर्चाचा लेखाजोखा सादर केल्यानंतर २०१७-१८ चा ७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने वितरित केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत परभणी महानगरपालिकेने जिल्हा प्रशासनाकडे तीन वर्षांतील १२ कोटी रुपयांच्या खर्चाचा लेखाजोखा सादर केल्यानंतर २०१७-१८ चा ७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने वितरित केला आहे़परभणी महानगरपालिकेला नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २०१४-१५ मध्ये १ कोटी ५० लाख, २०१५-१६ मध्ये ५ कोटी ५० लाख व २०१६-१७ मध्ये ५ कोटी ५० लाख असा तब्बल १२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वितरित केला होता; परंतु, वितरित केलेल्या या निधी खर्चाचे उपयोगीता प्रमाणपत्र महानगरपालिकेने समाजकल्याण विभाग व राज्य शासनाकडे सादर केले नव्हते़ त्यामुळे २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध झालेल्या ७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने रोखून धरला होता़ या संदर्भातील वृत्त ३ मे रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते़त्यामुळे मनपाचे पदाधिकारी खडबडून जागे झाले़ या संदर्भात मनपातील अधिकाऱ्यांना काही पदाधिकाºयांनी जाब विचारला़ त्यानंतर हालचाली झाल्या व तिन्ही वर्षांचे निधी खर्चाचे उपयोगीता प्रमाणपत्र मनपाने नुकतेच जिल्हा प्रशासनाला सादर केले़ त्यानंतर जिल्हा प्रशासनाने २०१७-१८ या वर्षासाठी आलेला ७ कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेला वितरित केला आहे़ या निधीतून रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा योजना, नाली दुरुस्ती आदी कामे करावयाची आहेत़कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्हदलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मिळालेल्या निधीतून परभणी शहरात २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षांच्या कालावधीत अनेक कामे करण्यात आली़ परंतु, या कामांचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे समोर आले आहे़ आता पुन्हा ७ कोटी रुपयांचा निधी मनपाला देण्यात आला आहे़ या निधीतूनही होणाºया कामांचा दर्जा समाधानकारक राहिल की नाही? या विषयी साशंकता आहे़ त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनीच याकडे लक्ष देऊन कामाचा दर्जा चांगला राहील, याबाबत कठोर निर्णय घ्यावेत, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी