शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी- मुदखेड दुहेरी रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:49 IST

परभणी ते मुदखेड या ८१ कि.मी. दुहेरी रेल्वेमागार्चे काम अंतिम टप्प्यात आले असून ५ फेब्रुवारीपर्यंत या रेल्वेमागार्ची सुरक्षा चाचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

अतुल शहाणे ।लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा: परभणी ते मुदखेड या ८१ कि.मी. दुहेरी रेल्वेमागार्चे काम अंतिम टप्प्यात आले असून ५ फेब्रुवारीपर्यंत या रेल्वेमागार्ची सुरक्षा चाचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.परभणी ते मुदखेड या दुहेरी रेल्वेमागार्ला २०१२ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत ३९० कोटी ६० लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्यात परभणी ते मिरखेल या १७ कि.मी.दुहेरी रेल्वेमागार्चे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर दुसºया टप्प्यात लिंबगाव ते नांदेड या १९ कि.मी. रेल्वेमागार्चे पूर्ण करण्यात आले. त्यानंतर आता तिसºया टप्प्यात रेल्वे मागार्चे पूर्ण काम करण्याचे उद्दिष्ट या विभागाकडून ठेवण्यात आले होते. त्या अनुषंगाने सदरील यंत्रणा कामामध्ये मोठ्या प्रमाणात व्यस्त होती. परभणी ते पूर्णा या मार्गावरील पूर्णा नदीवरील रेल्वे पुलाच्या कामाला वेळ लागत होता. त्यामुळे या पुलाचे काम प्राधान्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर केले. दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक भुपेंद्रसिंग यांनी पूर्णा येथील भेटी दरम्यान हा मार्ग एका महिन्याच्या कालावधीत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने माहिती घेतली असता परभणी ते मुदखेड या ८१ कि.मी. दुहेरी रेल्वे मागार्चे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता केवळ रेल्वे स्थानका दरम्यान असलेल्या नॉन इंटर लॉकिंग, सिग्नल यंत्रणा, नवीन रेल्वे पुलांची तपासणी व नवीन मागार्ची सुरक्षा चाचणी ही कामे शिल्लक राहिली आहेत. पाच तारखे पासून नॉन इंटर लोकींग चे काम सुरू होईल त्या नंतर सिंगनल यंत्रणेची १० ते १२ फेब्रु दरम्यान सुरक्ष चाचणी झाल्यानंतर हा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी १५ ते १७ फेब्रु दरम्यान खुला होण्याची शक्यता आहे. यामुळे परभणी ते मुदखेड या रेल्वे मार्गावरील एक्सप्रेस व लोकल रेल्वे उशिराने धावण्याचे प्रमाण कमी होणार आहे. परिणामी परभणी ते नांदेड व नांदेड ते औरंगाबाद हे प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे सुरक्षा चाचणीकडे लक्ष लागले आहे.तीन वर्षात २४४ कोटी खर्च४परभणी ते मुदखेड या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी मागील तीन वर्षात २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. २०१२-१३ मध्ये या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली. या रेल्वेमार्गाचा प्रकल्प एकूण खर्च ३९० कोटी ६० लाख रुपयांचा आहे. केंद्र शासनाने या रेल्वेमार्गाला टप्प्याटप्याने निधी दिला आहे. आणखी काही कामे करण्यासाठी प्रशासनाला निधीची आवश्यकता आहे. या मार्गावरील लहान व मोठ्या पुलांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पूर्णा नदीवरील रेल्वे पुुलाचे काम पूर्ण करणे हे रेल्वे विभागासाठी मोठे आव्हान होते. या कामात रेल्वे प्रशासनाला अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करुन प्रशासनाने या पुलाचे काम पूर्ण केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वे