शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत आंदोलन;मॉब लिंचिंग प्रकरणी नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:06 IST

मॉब लिंचिंगच्या प्रकरणात राज्यभरात आंदोलने सुरू असून, शुक्रवारी परभणी येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तर पूर्णा येथे जमियत उलमा व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मॉब लिंचिंगच्या प्रकरणात राज्यभरात आंदोलने सुरू असून, शुक्रवारी परभणी येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तर पूर्णा येथे जमियत उलमा व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.देशभरात मॉबलिंचिंगचे प्रकार वाढत असल्याने बहुजन क्रांती मोर्चाने या घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. सकाळी १० वाजेपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. विविध वक्त्यांनी आपल्या भाषणांमधून या घटनांचा निषेध नोंदविला. मागील चार वर्षात देशात मॉब लिंचिंगच्या २६६ घटना घडल्या असून, झारखंड राज्यात १८ घटना आतापर्यंत घडल्या आहेत. या घटना राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप वक्त्यांनी केला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्टÑपतींना निवेदन पाठविण्यात आले. मॉब लिंचिंगच्या विरोधात कायदा करुन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, तरबेज अंसारी यांच्या पत्नीस शासकीय नोकरी देऊन कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी आदी ८ मागण्या करण्यात आल्या. या निवेदनावर लखन चव्हाण, डॉ.लंगोटे, सुभाष साळवे, आरेफ पटेल, खमिसा मो.जुनेद, स.अ. कादर, अ‍ॅड.शहनवाज, अ‍ॅड.सलाम, वहीद पटेल, इमरान खान आदींची नावे आहेत.पूर्णा येथे : तहसीलदारांना दिले निवेदनच्पूर्णा : मॉब लिंचींग प्रकरणातील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह विविध मागण्या करीत ५ जुलै रोजी जमियत उलमा व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. प्रकरणी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.च्पूर्णा येथे शुक्रवारी दुपारी जामा मशीद येथून मूक मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव जमा झाले होते. दुपारी २ वाजता निघणारा मोर्चा काही करणाने रद्द करण्यात आला. मात्र याच ठिकाणी मागण्यांचे निवेदन देण्याची भूमिका संयोजकांनी घेतली.च्त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन त्यात विविध मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या. मॉब लिंचिंग बाबत कायदा तयार करून झारखंड प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मयत तबरेज अन्सारी यांच्या पत्नीला शासकीय नोकरी व घरातील मंडळींना एक कोटी रुपये मोबदला द्यावा आदी मागण्या केल्या.च्यावेळी मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी