शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाच वर्षांत सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:31 IST

नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयाने सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे़ या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार सामान्यांच्या हिताचे नाही, अशी टीका खा़ सुप्रिया सुळे यांनी येथे केली़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयाने सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे़ या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार सामान्यांच्या हिताचे नाही, अशी टीका खा़ सुप्रिया सुळे यांनी येथे केली़राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद यात्रेनिमित्त खा़ सुप्रिया सुळे १० सप्टेंबर रोजी येथे आल्या होत्या़ यानिमित्त जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या सभेस हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते़ यावेळी खा़ सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली़ शेतकरी कर्जमाफी व शेतकºयांच्या आत्महत्यांबाबत सरकारला देणे-घेणे नाही़ शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे़ संपूर्ण देशात नोटाबंदी लागू केल्यानंतर अर्थव्यवस्था कोलमडली असून, व्यापार ठप्प झाला आहे़ हाताला काम नाही, बेरोजगारी वाढली, शेतकºयांची कर्जमाफी नाही़ अशा परिस्थितीत सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे़ या परिस्थितीला हे सरकारच जबाबदार असून, या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या़ विजय भांबळे यांच्यासारखे आमदार तुम्हाला मिळाले आहेत़ त्यामुळे मतदार संघाचा विकास होत आहे़ त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवा व मतदारसंघाचा कायापालट करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले़ कार्यक्रमास शिवचरित्र व्याख्याते प्रा़ यशवंत गोसावी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, सारंगधर महाराज, जि़प़ सदस्या शालिनीताई राऊत, इंदूबाई घुगे, मीनाताई राऊत, अरुणा काळे, संगीता घोगरे, नमिता बुधवंत, ममता मते, अजय चौधरी, बाळासाहेब रोडगे, सभापती इंदुमती भवाळे, उपसभापती विजय खिस्ते, नगराध्यक्षा सबिया बेगम कपिल फारुखी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांच्यासह पंचायत समितीचे सर्व सदस्य, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते़५०० कोटींपेक्षा अधिक निधी खेचून आणला- विजय भांबळे४आ़ विजय भांबळे म्हणाले, निवडून आल्यापासून मतदारसंघ कधीही सोडला नाही़ सातत्याने दौरे केले़ त्यामुळे नागरिकांचे प्रश्न समजू लागले़ हे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला़ त्यातूनच विविध योजनांच्या माध्यमातून जिंतूर मतदारसंघासाठी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खेचून आणला़४तालुक्यातील रस्ते, शिक्षण, वीज, आरोग्य आदी प्रश्न सोडविण्यासाठी कधीही कमी पडला नाही़ जनतेच्या कामांसाठी माझ्या कार्यालयाचे दरवाजे २४ तास उघडे असतात, असे सांगून जिंतूर तालुक्यातील काही लोक निवडणुकीपुरते मतदारसंघात फिरतात़ त्यानंतर पाच वर्षे गायब होतात, असा आरोप आ़ भांबळे यांनी केला़

टॅग्स :parabhaniपरभणीSupriya Suleसुप्रिया सुळेFarmerशेतकरी