शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कृषी विद्यापीठाचे एमएयुएस ७१ सोयाबीन वाण नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:45 IST

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीन एमएयुएस ७१ हे बियाणे पैदासकर व पायाभूत बियाणे म्हणून नापास ठरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीन एमएयुएस ७१ हे बियाणे पैदासकर व पायाभूत बियाणे म्हणून नापास ठरले आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने २०१८-१९ मध्ये सोयाबीन एमएयुएस ७१ या वाणाचा पैदासकार व पायाभूत बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या महाविद्यालय व संशोधन केंद्रावर राबविण्यात आला. महाबीजने हे वाण शुद्ध नसल्याचा अहवाल वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील संचालक संशोधन विभागाला दिला आहे.दरम्यान या अहवालानंतर ४ डिसेंबर रोजी संचालक संचालनालयात कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीतील चर्चेनंतर कुलगुरू डॉ.ढवण यांनी संचालक संशोधन यांच्या नावाने पत्र काढले असून, त्यात म्हटले आहे की, सोयाबीन एमएयुएस ७१ या वानाचा पैदासकार व पायाभूत बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या महाविद्यालय व संशोधन केंद्रावर राबविण्यात आला असून अनुवंशिक शुद्धते अभावी हा संपूर्ण बीजोत्पादन कार्यक्रम बाद ठरला आहे. विविध स्तरावर बियाणे उत्पादन कार्यक्रमात बियाणांची अनुवंशिक शुद्धता राखण्याकरिता योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रतिमेला गालबोट लागण्याबरोबरच आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागले आहे. विद्यापीठाच्या वेगवेगळ्या पिकांचा जो बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जाणार आहे, त्यानुषंगाने घेतलेल्या निर्णयाचे सर्व संबंधितांनी काटेकोर पालन करावे व भविष्यात असा हलगर्जीपणा दिसून आल्यास योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना डॉ.ढवण यांनी संचालक संशोधक यांना दिल्या आहेत.भेसळयुक्त बिजपुरवठा; श्रीनिवास मुंडे यांची राज्यपालांकडे तक्रारया प्रकरणात जिल्हा परिषदेचे कृषी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी राज्यपालांना पत्र पाठविले असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने महाबीज मंडळ व शेतकऱ्यांना सोयाबीन ७१ चा भेसळयुक्त बीजपुरवठा केल्याची तक्रार केली आहे. राज्यातील चारही विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांना पायाभूत बियाणांचा पुरवठा करणे अपेक्षित आहे.अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बियाणे कृषी विद्यापीठाने पुरविल्यास शेतकºयांना जास्त उत्पादन मिळविता येईल. मात्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शुद्ध बियाणांमध्ये भेसळ करीत शुद्ध बियाणे म्हणून पुरवठा करून शेतकºयांची फसवणूक केली आहे. ही बाब महाराष्ट्र राज्य सिड्स कार्पोरेशन लि. मार्फत कृषी विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली आहे.ही बाब गंभीर असून, भेसळयुक्त बियाणे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा तसेच विद्यापीठाचे कुलगुरू आणि संचालक संशोधन यांना बडतर्फ करावे, अशी मागणी कृषी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी कुलपती तथा राज्यपालांकडे केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ