शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

परभणीची बाजारपेठ :संक्रांतीच्या खरेदीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:54 IST

नवीन वर्षातील पहिल्याच मकरसंक्रांती सणाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठेत शनिवारी तोबा गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले़ भाज्यांपासून ते विविध वस्तुंपर्यंत सर्वच दुकानांवर खरेदीसाठी गर्दी झाली होती़ यामुळे यावर्षीच्या पहिल्याच सणाला बाजारपेठेतील उलाढालीत मोठी वाढ झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नवीन वर्षातील पहिल्याच मकरसंक्रांती सणाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठेत शनिवारी तोबा गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले़ भाज्यांपासून ते विविध वस्तुंपर्यंत सर्वच दुकानांवर खरेदीसाठी गर्दी झाली होती़ यामुळे यावर्षीच्या पहिल्याच सणाला बाजारपेठेतील उलाढालीत मोठी वाढ झाली आहे़१४ जानेवारी रोजी जिल्हाभरात मकरसंक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे़ मकरसंक्रांत हा महिलांचा सण असल्याने बाजारपेठेमध्ये विविध वस्तू खरेदी करण्यासाठी आठ दिवसांपासून गर्दी होत आहे़ संक्रांतीच्या पूर्वसंध्येला या गर्दीत मोठी वाढ झाल्याचे पहावयास मिळाले़ सकाळपासूनच बाजारपेठ फुललेली होती़ शनिवारी सर्वत्र भोगीचा सण साजरा करण्यात आला़या सणासाठी रानमेव्याची पूजा केली जाते़ यानिमित्ताने बोर, ऊस, जांब, हरभरा, वाल्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा मोठ्या प्रमाणात विक्रीला आल्या होत्या़ विविध भाज्यांच्या खरेदीबरोबरच पूजेच्या साहित्याची खरेदीही यानिमित्ताने झाली़शहरातील गांधी पार्क, गुजरी बाजार परिसरात संक्रांतीसाठी लागणाºया वाणाच्या वस्तुंची दुकाने सजली होती़ त्याचप्रमाणे हळद, कुंकू, विविध रंगांची रांगोळी, गुलाल असे पुजेचे साहित्यही विक्रीसाठी उपलब्ध होते़ संक्रांतीला सुगड्यांचे महत्त्व असल्याने जागोजागी सुगडे विकणाºयांनीही आपली दुकाने थाटली होती़यावर्षी प्रथम गांधी पार्काबरोबरच देशमुख हॉटेल, काळी कमान भागातही विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती़ गांधी पार्क व परिसरामध्ये दुकाने थाटण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी विक्रेत्यांनी पर्यायी जागा निवडली़ तेथेही खरेदीसाठी गर्दी झाली होती़संक्रांतीची लगबगरविवारी मकर संक्रांतीचा मुख्य सण साजरा केला जात आहे़ यादिवशी सुवासिनी वाणांचा आवा लुटतात़ यानिमित्ताने सायंकाळच्या सुमारास ठिक ठिकाणी हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेतले जातात़ मागील काही वर्षांपासून पर्यावरण पूरक संक्रांती साजरी करण्याची प्रथाही रूढ झाली असून, रोपट्यांचा आवा दिला जात आहे़ यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात येतो़तीळ-गुळाचे भाव स्थिरमकर संक्रांतीच्यानिमित्ताने एकमेकांना तीळ-गुळ देण्याची प्रथा आहे़ यासाठी बाजारपेठेत तीळ आणि गुळाची मोठी विक्री झाली़ मागील वर्षीच्या तुलनेत तीळ आणि गुळांचे भाव स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़ १०० रुपये किलो तीळ आणि ३५ रुपये किलो गुळ या दराने दिवसभर तीळ आणि गुळाची विक्री झाली़ त्याच प्रमाणे साखरेपासून बनविलेला हलव्यालाही मागणी वाढली होती़