शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ट्रायको कार्डनेच बोंडअळीचे व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:24 IST

शेतकऱ्यांमध्ये कीड व्यवस्थापनात जैविक पद्धतीबाबत जागरुकता होत आहे; परंतु, जैविक निविष्ठांची योग्य वेळी उपलब्धता होत नाही़ कापूस पिकामध्ये ट्रायको कार्डचा वापर केल्यास बोंडअळीचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येईल, असे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकऱ्यांमध्ये कीड व्यवस्थापनात जैविक पद्धतीबाबत जागरुकता होत आहे; परंतु, जैविक निविष्ठांची योग्य वेळी उपलब्धता होत नाही़ कापूस पिकामध्ये ट्रायको कार्डचा वापर केल्यास बोंडअळीचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येईल, असे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले यांनी केले़येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी कीटकशास्त्र विभागातील परोपजीवी कीटक संशोधन योजना व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत जैविक घटक, त्याची निर्मिती व कीड व्यवस्थापनातील उपयुक्ता या विषयावर १२ जून रोजी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला़ या प्रसंगी इंगोले बोलत होते़ कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ़ दत्तप्रसाद वासकर, विभागप्रमुख डॉ़ पुरुषोत्तम झंवर, जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेचे प्रभारी अधिकारी बबन वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़ दत्तप्रसाद वासकर म्हणाले, परोपजीवी कीटक संशोधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ट्रायको कार्डची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न केला जाईल़ याद्वारे कमी खर्चात अधिक प्रभावीपणे गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन होऊ शकेल़ डॉ़ पी़ आऱ झंवर यांनी प्रास्ताविक केले़ यावेळी डॉ़ एम़एम़ सोनकांबळे, डॉ़ बी़व्ही़ भेदे, डॉ़ एस़एस़ धरगुडे, डॉ़ ए़जी़ बडगुजर आदींनी तांत्रिक सादरीकरण करून ट्रायको कार्ड निर्मितीची माहिती दिली़ वनस्पती विकृतीशास्त्र विभागात बायोमिक्स, ट्रायकोडर्मा व जैविक बुरशी निर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले़४या प्रशिक्षणात शासकीय जैविक कीड नियंत्रण प्रयोग शाळेतील अधिकारी, कर्मचारी, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्र, क्रॉपसॅप प्रकल्पातील जिल्हा समन्वयक, शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते़४येत्या हंगामात औरंगाबाद, परभणी व नांदेड येथील जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा व विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभागात ट्रायको कार्डची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी