शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

परभणी : महावितरण कंपनीने ‘बँडबाजा’ मोहीम गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:51 IST

मोठ्या थकबाकीदार ग्राहकांकडील वसुलीसाठी त्यांच्या घरासमोर बॅण्डबाजा वाजवून वसुली करण्याची महावितरणने सुरू केलेली मोहीम पहिल्याच दिवशी गुंडाळावी लागली आहे. या मोहिमेसंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आल्याने आता बॅण्डबाजा न वाजविता केवळ वसुली मोहीमच राबविण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मोठ्या थकबाकीदार ग्राहकांकडील वसुलीसाठी त्यांच्या घरासमोर बॅण्डबाजा वाजवून वसुली करण्याची महावितरणने सुरू केलेली मोहीम पहिल्याच दिवशी गुंडाळावी लागली आहे. या मोहिमेसंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आल्याने आता बॅण्डबाजा न वाजविता केवळ वसुली मोहीमच राबविण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.महावितरणच्या परभणी मंडळ कार्यालयांतर्गत वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर सातत्याने वाढत आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले जिल्ह्यामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १४३९ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ३३ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे.सदरील थकबाकी वसूल करण्यासाठी वीज ग्राहकांच्या घरासमोर २५ सप्टेंबरपासून बॅण्ड वाजवत वीज बिल भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले होते. यामध्ये परभणी ग्रामीण उपविभागांतर्गत ५८८ वीज ग्राहकांकडे ११ कोटींची थकबाकी आहे. तसेच परभणी शहरातील २५९ वीज ग्राहकांकडे ८ कोटी ५ लाख, पाथरी उपविभागांतर्गत ६५ ग्राहकांकडे १ कोटी ७३ लाख, पूर्णा उपविभागांतर्गत ७४ ग्राहकांकडे १ कोटी ४१ लाख, गंगाखेड उपविभागातील ६३ ग्राहकांकडे १ कोटी ९५ लाख, जिंतूर उपविभागांतर्गत १९८ वीज ग्राहकांकडे ४ कोटी २९ लाख, मानवत उपविभागातील ३८ वीज ग्राहकांकडे १ कोटी २६ लाख, सेलू उपविभागातील ७८ ग्राहकांकडे १ कोटी ९२ लाख तर सोनपेठ उपविभागातील ४५ ग्राहकांकडे ८९ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीच्या गर्देत सापडलेल्या महावितरणने बुधवारपासून सुरु होणाऱ्या या विशेष वसुली मोहिमेत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, जनमित्र सहभागी होणार होेते. त्याच बरोबर पोलीस यंत्रणाही या मोहिमेत सोबत राहणार होती.वीज ग्राहकांच्या घरासमोर बॅन्डबाजा वाजवत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरण प्रशासन सज्ज झाले होते; परंतु, वीज ग्राहकांच्या घरासमोर बॅण्ड वाजवून वसुली करणे असे कोणत्याही शासकीय परिपत्रकात किंवा शासन निर्णयामध्ये नाही. त्यामुळे ग्राहकांच्या अधिकारांचे हनन होऊ नये म्हणून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बॅण्डबाजा वाजविण्याची मोहीम तात्काळ रद्द करून केवळ घरोघरी जाऊन वीज बिलाची वसुली करा, असे आदेश अधीक्षक अभियंता कार्यालयाला दिले आहेत. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांच्या दारात बॅण्ड वाजविण्यास सज्ज असलेल्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी व वसुली पथकाची मात्र चांगलीच गोची झाली आहे. बॅण्डबाजा मोहीम रद्द करीत ग्राहकांच्या घरी जाऊन महावितरणचे अधिकारी, कर्मचारी वीज बिलाची वसुली करीत असल्याचे २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात दिसून आले.जिल्ह्यात अशी झाली वीजबिल वसुली४एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले जिल्ह्यामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १४३९ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ३३ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या वतीने १८ सप्टेंबरपासून मोहीम राबविण्यात येत आहे.४यामध्ये परभणी ग्रामीण उपविभागांतर्गत एका वीज ग्राहकाकडून २ लाख ९७ हजार, परभणी शहर उपविभागांतर्गत २२ ग्राहकांकडून ३५ लाख ७३ हजार, पाथरी उपविभागांतर्गत २ ग्राहकांकडून ३ लाख ३१ हजार, पूर्णा उपविभागांतर्गत ४ ग्राहकांकडून ३ लाख ७२ हजार, गंगाखेड उपविभागांतर्गत ८ ग्राहकांकडून ८ लाख ९३ हजार, जिंतूर उपविभागांतर्गत ५ ग्राहकांकडून १४ लाख ६२ हजार, मानवत उपविभागांतर्गत ३ ग्राहकांकडून ६ लाख १४ हजार, पालम उपविभागांतर्गत ३ ग्राहकांकडून १ लाख ९८ हजार, सेलू उपविभागांतर्गत ७ ग्राहकांकडून १२ लाख ४ हजार तर सोनपेठ उपविभागांतर्गत एका ग्राहकाकडून ५० हजारांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. त्यामुळे महावितरणने १९ ते २४ सप्टेंबर या कालावधीत ५६ ग्राहकांकडून ९२ लाख ९४ हजार रुपयांची वसुली केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण