शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

परभणीत अडीच हजार क्विंटल तुरीची केली खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 10:36 IST

जिल्ह्यात ५ ठिकाणी हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू झाले असून, एक आठवड्यामध्ये केवळ २२८ शेतकºयांची २ हजार ४५१ क्विंटल तूर शासनाने खरेदी केली आहे़ हमीभाव मिळत असतानाही तूर उत्पादक मात्र केंद्रावर तूर घालण्यासाठी उदासिन असल्याची परिस्थिती सध्या दिसत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात ५ ठिकाणी हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू झाले असून, एक आठवड्यामध्ये केवळ २२८ शेतकºयांची २ हजार ४५१ क्विंटल तूर शासनाने खरेदी केली आहे़ हमीभाव मिळत असतानाही तूर उत्पादक मात्र केंद्रावर तूर घालण्यासाठी उदासिन असल्याची परिस्थिती सध्या दिसत आहे़परभणी जिल्ह्यात तुरीचे उत्पादक मोठ्या प्रमाणात झाले आहे़ शासनाने तुरीला ५ हजार ४५० रुपये प्रती क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे़ प्रत्यक्षात परभणी जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र उशिराने सुरू झाले़ साधारणत: १ ते दीड महिना हे केंद्र उशिरा सुरू झाल्याने तूर उत्पादकांची मोठी फरफट झाली़ घरात तूर येऊन पडली असताना हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकºयांना नाईलाजाने खाजगी बाजारात तुरीची विक्री करावी लागली़ शासनाने तुरीसाठी ५ हजार ४५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी खुल्या बाजारपेठेत मात्र जास्तीत जास्त ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल या दराने तूर खरेदी करण्यात आली़ त्यामुळे तूर उत्पादकांना क्विंटल मागे तब्बल १ ते दीड हजार रुपयांचा फटका सहन करावा लागला़ हमीभाव खरेदी केंद्रासाठी शेतकºयांची ओरड वाढत असल्याने फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात ५ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ पहिले केंद्र परभणी येथे ७ फेब्रुवारी रोजी सुरू झाले तर गंगाखेड तालुक्यात १५ फेब्रुवारी रोजी हमी भाव खरेदी केंद्रावर खरेदीला सुरुवात करण्यात आली़ पाचही खरेदी केंद्रांवर आतापर्यंत २२८ शेतकºयांची २ हजार ४५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे़ १ कोटी ३३ लाख ६० हजार ६७५ रुपयांची तूर शासनाने खरेदी केली आहे़जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार शेतकºयांनी प्रशासनाकडे नोंदणी केली आहे़ त्या तुलनेत या आठ दिवसांत केवळ २२८ शेतकºयांची तूर खरेदी झाली़ नवीन पद्धतीनुसार नोंदणी केलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी केली जाणार आहे़ शासकीय तूर खरेदी केंद्राच्या वतीने तूर उत्पादकांना प्रत्येक दिवशी मोबाईलवर संदेश देऊन तूर विक्रीसाठी आणण्याचे सूचित केले जात आहे़ परंतु, तूर उत्पादक मात्र त्या तुलनेत प्रतिसाद देत नसल्याचे दिसत आहे़हमीभाव खरेदी केंद्रावर बाजारपेठेच्या तुलनेत चांगला भाव मिळत असतानाही उत्पादकांनी मात्र पाठ फिरविली आहे़ अनेक शेतकºयांनी नोंदणीची झंजट नको म्हणून खुल्या बाजारपेठेतच तुरीची विक्री केली आहे़ त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही तुरीच्या खरेदीला उठाव मिळेनासा झाला आहे़गंगाखेडमध्ये सर्वाधिक तूर खरेदीजिल्ह्यात परभणी, जिंतूर, गंगाखेड, सेलू आणि पूर्णा या पाच ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले आहेत़ विशेष म्हणजे गंगाखेड येथील खरेदी केंद्र सर्वात उशिराने १५ फेब्रुवारी रोजी सुरू झाले असून, अवघ्या सात दिवसांमध्ये या केंद्रावर ५० शेतकºयांची ६१७ क्विंटल तूर खरेदी झाली आहे़ तर परभणी येथील खरेदी केंद्रावर १९ शेतकºयांची २७१ क्विंटल, जिंतूरच्या खरेदी केंद्रावर ७१ शेतकºयांची ५१६ क्विंटल, सेलू केंद्रावर ३७ शेतकºयांची ४२५ क्विंटल, पूर्णा येथील खरेदी केंद्रावर ५१ शेतकºयांची ६२१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे़लाल रंगाच्या दोरीसाठी धावपळतूर खरेदी करताना ती कोणत्या विभागातून खरेदी झाली आहे़ हे लक्षात यावे, यासाठी यंदा शासनाने प्रत्येक विभागात तुरीचे पोते शिवण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या दोºया वापरण्याचे निर्देश दिले आहेत़ मराठवाडा विभागासाठी लाल रंगाच्या दोरीने पोते टाचायचे आहे़ त्यामुळे लाल रंगाची दोरी शोधण्यासाठी कर्मचाºयांना धावपळ करावी लागली़ परभणीच्या बाजारपेठेत लाल रंगांच्या दोºया उपलब्ध असल्या तरी तालुक्याच्या ठिकाणी या दोºया मिळतील की नाही, अशी शंका आहे़ त्यामुळे मिळेल त्या दोरीला लाल रंगाने रंगवून पोते शिवले जात आहेत़आज सुरू होणार बोरीचे केंद्रबोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे़ या बाजार समितीत परिसरातील अनेक शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ विशेष म्हणजे खरेदी केंद्रासाठी या ठिकाणी आंदोलनही झाले होते़ या सर्व पार्श्वभूमीवर बोरी येथे केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून, २२ फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात या केंद्राला सुरुवात होईल, अशी माहिती मार्केटींग फेडरेशनच्या वतीने देण्यात आली़