शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

परभणी :सीओंच्या कक्षाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:23 IST

थकित पेंशन व डीएची वाढ द्यावी, या मागणीसाठी संतप्त सेवानिवृत्तांनी २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पालिकेतील मुख्याधिकाºयांच्या कक्षाला कुलूप ठोकले. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर पाच तासांनी हे कुलूप उघडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : थकित पेंशन व डीएची वाढ द्यावी, या मागणीसाठी संतप्त सेवानिवृत्तांनी २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पालिकेतील मुख्याधिकाºयांच्या कक्षाला कुलूप ठोकले. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर पाच तासांनी हे कुलूप उघडण्यात आले.पूर्णा नगरपालिकेच्या विविध विभागातून सेवानिवृत्त झालेल्या ५० हून अधिक कर्मचाºयांना मागील अनेक महिन्यांपासून सेवानिवृत्त वेतन मिळाले नाही. त्यामुळे या कर्मचारी कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. वयोवृद्ध सेवानिवृत्तांना वैद्यकीय खर्चासाठीही अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच सेवानिवृत्ती वेतनाबरोबरच डीएतील वाढीची रक्कमही या कर्मचाºयांना मिळाली नाही. त्यामुळे २४ जानेवारीपासून ५० सेवानिवृत्त कर्मचाºयांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. पालिका प्रशासनाने या आंदोलनाची अद्यापपर्यंत दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी सोमवारी सकाळी पूर्णा पालिकेच्या मुख्याधिकाºयांच्या कक्षाला कुलूप ठोकले. या प्रकारानंतर फौजदार गणेश राठोड घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मोजकेच अधिकारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनातील अधिकाºयांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांशी चर्चा केली. या चर्चेनंतर सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिल्याने पाच तासानंतर कुलूप उघडण्यात आले. या आंदोलनात एम.जे.नगरे, बी.बी.जैन, पाईकराव, एम.एस. आरे, एम.डी. जोशी, श्रीराम कदम, लक्ष्मीबाई गवळी, लक्ष्मीबाई वावळे, शोभाबाई गायकवाड, लक्ष्मण कदम आदींनी सहभाग नोंदविला.