शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ५७ लाखांसाठी रखडले बेरोजगारांचे कर्ज प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:02 IST

येथील वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जमाती विकास महामंडळाला ५७ लाख रुपयांचा निधी शासनाकडून न मिळाल्याने २०१४-१५ पासून बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव रखडले आहेत.

न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जमाती विकास महामंडळाला ५७ लाख रुपयांचा निधी शासनाकडून न मिळाल्याने २०१४-१५ पासून बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव रखडले आहेत.भटक्या विमुक्त जमाती घटकातील युवकांनी स्वत:चा व्यवसाय उभारून आर्थिक प्रगती साधवी, यासाठी वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जमाती महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांसाठी हे महामंडळ कार्य करते. बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यात ७५ टक्के हिस्सा बँकेचा आणि २५ टक्के हिस्सा महामंडळाचा आहे. पाच वर्षाच्या परतफेडीच्या अटीवर ४ टक्के दराने व्यवसायासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिले आहे.परभणी येथील वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जमाती विकास महामंडळाकडे या योजनेंतर्गत बेरोजगार लाभार्थ्यांनी २०१४-१५ पासून कर्ज प्रस्ताव दाखल केले आहेत. किराणा दुकान, दुग्ध व्यवसाय, ब्युटी पार्लर, टेलरिंग, कृत्रिम रेशीम, मशरूम उत्पादन, सुतार काम, इलेक्ट्रीशियन, मोटार रिवायंडिग आदी छोट्या व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या महामंडळाकडे आतापर्यंत १६६ बेरोजगारांनी कर्जाचे प्रस्ताव दाखल केले आहेत. विशेष म्हणजे महामंडळानेही या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे; परंतु, जोपर्यंत महामंडळाचा २५ टक्के हिस्सा बँकांकडे उपलब्ध होत नाही, तोपर्यंत प्रत्यक्ष कर्जाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत नाही. त्यामुळे चार वर्षांपासून लाभार्थी महामंंडळाकडे खेटा मारीत आहेत. कर्ज प्रस्ताव मंजूर होऊनही हातात रक्कम पडत नसल्याने लाभार्थ्यांचा हिरमोड होत आहे. शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी लाभार्थ्यांमधून केली जात आहे.४मागील चार ते पाच वर्षांपासून महामंडळातून कर्ज उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे यावर्षी तर महामंडळाला कर्जांचे उद्दिष्टही दिले नाही. त्यामुळे या वर्षात एकाही लाभार्थ्याचा कर्ज प्रस्ताव महामंडळाने स्वीकारला नाही, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.शासनाकडे नोंदविली निधीची मागणी२०१४-१५ पासून कर्जाचे प्रस्ताव मंजुरी नंतरही रखडले आहेत. शासनाकडून महामंडळाला निधी मंजूर होत नसल्याने महामंडळाची ही योजना कुचकामी ठरली आहे. दरम्यान, परभणी येथील व्यवस्थापकांनी १२ डिसेंबर रोजी महामंडळाच्या मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालकांकडे पत्र पाठविले असून चार वर्षांपासून रखडलेल्या कर्ज प्रस्तावांसाठी महामंंडळाच्या २५ टक्के हिश्याचा ५७ लाख ७३ हजार ७९२ रुपयांचा निधी अदा करावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना या निधीची प्रतीक्षा लागली आहे.महामंडळ उरले नावालाच४वसंतराव नाईक महामंडळाला मागील चार-पाच वर्षापासून निधी दिला जात नसल्याने महामंडळाच्या सर्वच योजना ठप्प पडल्या आहेत. ज्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना झाली तो उद्देशच निधीअभावी साध्य होत नाही. सध्यातरी जिल्ह्यातील लाभार्थी कर्ज प्रस्तावांसाठी महामंडळ कार्यालयाच्या खेटा मारून त्रस्त आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीbankबँक