शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

परभणी : जिल्ह्यात सोयाबीनच्या खरेदीला लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:47 IST

शेतमालाची हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी राज्य शासन व नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सहा ठिकाणी २० नोव्हेंबर रोजी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र दहा दिवस उलटले तरी एकाही केंद्रावरह सोयाबीनची खरेदी झाली नाही़ विशेष म्हणजे, परभणी व सेलूत अद्यापही केंद्र सुरू करण्यास जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाला मुहूर्तच सापडत नसल्याचे समोर आले आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतमालाची हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी राज्य शासन व नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सहा ठिकाणी २० नोव्हेंबर रोजी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र दहा दिवस उलटले तरी एकाही केंद्रावरह सोयाबीनची खरेदी झाली नाही़ विशेष म्हणजे, परभणी व सेलूत अद्यापही केंद्र सुरू करण्यास जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाला मुहूर्तच सापडत नसल्याचे समोर आले आहे़यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाला फाटा देत सोयाबीन, उडीद व मुगाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली़ कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांना म्हणावे तसे उत्पन्न मिळाले नाही़ मात्र उत्पादित शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर शेतकºयांची अडवणूक होत असल्याने जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, पालम, पाथरी व पूर्णा या सहा ठिकाणी नाफेड व राज्य शासनाच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास परवागनी मिळाली़ २० नोव्हेंबरपासून या सहा केंद्रांपैकी चार ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़१० दिवस उलटले असतानाही किलोभरही सोयाबीनची खरेदी हमीभाव खरेदी केंद्रांकडून करण्यात आली नाही़ त्यामुळे शेतकºयांना आपला शेतीमाल पडेल भावात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात खाजगी व्यापाºयांना विक्री करावा लागत आहे़ परंतु, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा जिल्हा मार्केटींग अधिकाºयांना याचे देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे़दुष्काळी परिस्थिती सापडलेल्या शेतकºयांसाठी लोकप्रतिनिधींनी तरी पुढे येथून हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकºयांचा शेतमाल घेण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांमधून करण्यात येत आहे़११ हजार ९० शेतकºयांनी केली नोंदणीजिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रांवर शेतमाल विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील ११ हजार ९० शेतकºयांनी जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकडे नोंदणी केली आहे़ २ हजार ९६४ मूग उत्पादकांनी, ३५२ उडीद तर ७ हजार ७९२ सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केला आहे; परंतु, हमीभाव खरेदी केंद्रांवर संथगतीच्या कारभाराने शेतकºयांचा शेतमाल नोंदणी करूनही घरातच पडून राहतो की काय अशी शंका शेतकºयांच्या उपस्थित होत आहे़४दरम्यान, परभणी व सेलू येथील हमीभाव खरेदी केंद्र तत्काळ कार्यान्वित करून जिल्ह्यातील शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी सोयाबीन, मूग, उडीद उत्पादकांतून होत आहे़़़़ तर शेत मालाला मिळेल भावजिल्ह्यातील सहाही ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले तर खाजगी बाजारपेठेमध्ये शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल़ परंतु, जिल्ह्यातील सहापैकी चार ठिकाणचे हमीभाव खरेदी केंद्र २० नोव्हेंबर रोजी सुरू झाले आहेत़ परंतु, सोयाबीनची खरेदी अद्यापही झालेली नाही़ त्यातच परभणी व सेलू केंद्राला खरेदीसाठी मुहूर्तच मिळाला नाही़ याचा फायदा खाजगी व्यापारी उठवित आहेत़सोयाबीन परभणी येथील केंद्रावर १ हजार ९३८ शेतकºयांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे़ त्याचबरोबर जिंतूर २ हजार ३७९, सेलू १ हजार ६५७, पालम १३००, पाथरी २९७ तर पूर्णा तालुक्यात २६१ अशा एकूण ७ हजार ७९२ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ परंतु, एकाही शेतकºयाचा माल खरेदी केला नाही़मूग विक्रीसाठी जिल्ह्यातील २ हजार ९४६ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़; परंतु, आतापर्यंत केवळ ३७९ क्विंटल ५३ किलोचीच खरेदी करण्यात आली आहे़ परभणी येथील केंद्रांवर ६१५, जिंतूर २२०, सेलू १३४२, पालम २३०, पाथरी ३८४ तर पूर्णा तालुक्यात १५३ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ या ठिकाणीही संथगतीचा फटका बसत आहे़उडीद विक्रीसाठी ३५२ शेतकºयांनी नोंदणी करून केवळ ९७ क्विंटल ४६ किलोचीच खरेदी झाली आहे़ परभणी केंद्रावर ३२, जिंतूर २२७, सेलू ६०, पालम १०, पाथरी ११ तर पूर्णा तालुक्यातील १२ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ मात्र खरेदी संथगतीने होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती