शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ३० लाखांचा अपहार; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:01 IST

तालुक्यातील ३०६ शेतकऱ्यांच्या नावाने बनावट खाते तयार करून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ३० लाख रुपयांचे अनुदान परस्पर लाटल्या प्रकरणी पूर्ण पोलिसांनी २७ जुलै रोजी दोन आरोपींना अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा(परभणी) : तालुक्यातील ३०६ शेतकऱ्यांच्या नावाने बनावट खाते तयार करून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ३० लाख रुपयांचे अनुदान परस्पर लाटल्या प्रकरणी पूर्ण पोलिसांनी २७ जुलै रोजी दोन आरोपींना अटक केली आहे.शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन संचासाठी पूर्णा येथील कृषी कार्यालयात कुठलाही अर्ज केला नसताना तालुक्यातील पिंपळा लोखंडे येथील शेतकरी सूर्यभान गंगाधर लोखंडे यांच्या नावे बोगस कागदपत्र तयार करून संच व त्यावरील मिळणारे २४ हजार ९८० रुपयांचे अनुदान परस्पर उचलण्याचा प्रकार मागील वर्षी उघडकीस आला होता.याप्रकरणी सूर्यभान लोखंडे यांनी परभणी येथील उपविभागीय कृषी अधिकाºयांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. उपविभागीय कृषी अधिकाºयांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी खुपसे यांच्या तक्रारीवरून पूर्ण पोलीस ठाण्यात जून २०१८ मध्ये अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता. या अपहार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पूर्ण पोलीस ठाण्याचे फौजदार चंद्रकांत पवार यांनी तपास केला. या प्ररकरणाच्या खोलात गेल्यानंतर पूर्णा तालुक्यात या योजनेअंतर्गत अशाच पद्धतीने ३०६ शेतकºयांचे कागदपत्रे तयार करून ताडकळस येथील बँकेत बनावट खाते उघडून तब्बल तीस लाख रुपयांचे अनुदान परस्पर लाटल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या प्रकरणात कृषी विभाग, बँकेचे अधिकारी, व्यापारी यांचे मोठे रॅकेट असल्याचे तपासात उघड झाले. दरम्यान, याप्रकरणी पूर्ण पोलिसांना हव्या असलेल्या आरोपींपैकी हरीष वंजे आणि कृषी सहाय्यक श्याम यशमोड यांना न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन दिला होता. आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे पोलिसांनी सादर केल्यानंतर न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन रद्द केला. त्यामुळे २७ जुलै रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आरोपी हरिष वंजे आणि कृषी सहाय्यक श्याम यशमोड या दोघांना नांदेड येथून अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पवार, नितीन वडकर, विष्णू भिसे, यांनी ही कामगिरी केली. शेतकºयांच्या हितासाठी सुरू केलेल्या या योजनेत अपहार झाल्याने शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले असून उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीfraudधोकेबाजीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प