शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वाहकाने १० रुपयांचा अपहार केल्याचे तपासणीत उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 23:27 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग तपासणी पथकाने एस.टी.बसची तपासणी सुरु करताच वाहकाला चक्कर येऊन त्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याने त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मरडसगाव पाटीवर घडला. यावेळी तपासणीत १० रुपयांचा अपहार झाल्याचे पथकाला आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग तपासणी पथकाने एस.टी.बसची तपासणी सुरु करताच वाहकाला चक्कर येऊन त्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याने त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मरडसगाव पाटीवर घडला. यावेळी तपासणीत १० रुपयांचा अपहार झाल्याचे पथकाला आढळून आले.गंगाखेड आगारातील धनेगाव- गंगाखेड ही एम.एच.०७-सी-७२४७ क्रमांकाची बस शनिवारी सकाळी धनेवाडी येथून गंगाखेडकडे येत होती. ७.३० वाजेच्या सुमारास मरडसगाव पाटीवर एस.टी.महामंडळाचे मार्ग तपासणी पथक उभे होते. यावेळी या पथकातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक शरद पाटील, आर.जी.शिंदे, वाहतूक नियंत्रक धनजकर, कदम यांनी बसमधून उतरणाऱ्या व बसमधील प्रवाशांजवळील तिकीटांची तपासणी सुरु केली. त्यावेळी मरडसगाव पाटीपर्यंत प्रवास करणाºया काही प्रवाशांपैकी एका प्रवाशाजवळ तिकीट आढळून आले नाही. याबाबत सदर प्रवाशाला विचारले असता त्याने वाहकाला दोन फुल्ल व एक हाफ तिकीटाचे पैसे दिल्याचे सांगितले. त्यानंतर केलेल्या तपासणीत सदर वाहकाने १० रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहक बालाजी संभाजी सावंत (४५, रा.बडवणी ता,गंगाखेड) यांचा जबाब नोंदविण्यासाठी विचारणा केली असता पैसे घेतल्याचे सांगत नजर चुकीने हा प्रकार घडल्याचे वाहकाने सांगितले. त्यानंतर सदरील वाहकास अचानक चक्कर आली व तो जागीच बसल्याने पथकातील कर्मचाºयांनी एस.टी.बस थेट गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणली. तेथे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.रेश्मा गौस, अधिपरिचारिका निता देशमुख, प्रशांत राठोड यांनी सदरील कर्मचाºयावर प्रथमोपचार केले; परंतु, वाहक बालाजी सावंत यांच्या हृदयाचे ठोके मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना समजताच स्थानक प्रमुख रामेश्वर हडबे, सहाय्यक वाहतूक निरिक्षक माऊली मुंडे व वाहकाने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी मोठी गर्दी झाली होती.कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादरमार्ग तपासणी दरम्यान धनेवाडी ते गंगाखेड चालणाºया बसमधील एका प्रवाशाकडे तिकीट आढळून आले नसल्याने व सदरील प्रवाशाने तिकीटाचे पैेसे वाहकाकडे दिल्याचा जबाब दिला. त्यामुळे सदरील वाहकावर १० रुपयांचा अपहार केल्याचा ठपका तपासणी पथकाने ठेवला असून सदरील कर्मचाºयावर पुढील कारवाई करण्यासंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला असल्याची माहिती तपासणी पथकातील शरद पाटील, आर.जी.शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटीfraudधोकेबाजी