लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतीसोबतच पशूसंवर्धन हा पूरक किंवा मुख्य व्यवसाय म्हणून शेतकºयांसाठी शाश्वत जीवनाचा आधार म्हणून महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.बी.व्यंकटेस्वरलू यांनी केले.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशूवैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे मंगळवारी उद्घाटन झाले.यावेळी कुलगुरु डॉ. बी.व्यंकटेस्वरलू, मनपा आयुक्त राहुल रेखावार, डॉ. ए.एस. बन्नाळीकर, डॉ.ए.पी. सोमकुंवर, डॉ.के.एस. पलानी स्वामी, डॉ.ए.थंगवेलू, डॉ.एस.बी. मांझी यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना व्यंकटेस्वरलू म्हणाले, रोग प्रतिकार आणि जैवतंत्रज्ञान शास्त्रातील आधुनिक पद्धतीचा वापर करुन शेतकºयांच्या समस्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.या परिषदेत मनपा आयुक्त राहुल रेखावार, डॉ.ए.एन.बन्नाळीकर, डॉ.ए.पी. सोमकुंवर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा.डॉ. एस.डी.देशपांडे यांनी आभार मानले. परिषदेसाठी देशभरातून शंभरहून अधिक शास्त्रज्ञ, प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.
परभणीत ाीन दिवसीय राष्ट्रीय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:49 IST