शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तापमानाने वाढली दुष्काळाची तीव्रता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:25 IST

जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत चालले असून ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. पाणीटंचाई बरोबरच उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर सुरु झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत चालले असून ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. पाणीटंचाई बरोबरच उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर सुरु झाला आहे.यावर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत वातावरणात थंडी निर्माण झाली होती; परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमान वाढू लागले. सोमवारी जिल्ह्यात ४० अंश तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारीही पारा वाढत जावून ४०.५ अंशावर स्थिरावला. तापमानाने ४० गाठल्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना सहन कराव्या लागल्या. मंगळवारी सकाळी १० वाजेपासूनच ऊन तापले होते. कडक उन्हामुळे दिवसभर उकाडाही निर्माण झाला होता.दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान शास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यापुढील चार दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. २७ मार्च रोजी ४१, २८ मार्च रोजी ४०, २९ मार्च रोजी ४१ आणि ३० मार्च रोजी परभणीचा पारा ४२ अंशावर पोहचण्याचा अंदाज वर्तविला आहे.कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसमी सेवा या विभागाने दिलेल्या माहितीनुसार किमान तापमानामध्ये ३० मार्चपर्यंत २४ अंशापर्यंतची वाढ वर्तविली आहे. सध्या हे तापमान २१ अंशापर्यंत आहे. किमान तापमानात वाढ झाल्यानंतर रात्रीच्या वेळी देखील वातावरणातील उकाडा वाढणार आहे.कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना दिवसा तीव्र उन्हाचे चटके तर रात्रीच्या वेळी अस्वस्थ करणाऱ्या उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. सध्या हा त्रास सुरु झाला असल्याने नागरिकांनी आतापासूनच काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठेमध्ये पांढरे रुमाल आणि टोप्या, गॉगल्सची विक्री वाढली आहे. तसेच कूलर, फॅन या इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही मागणी वाढली आहे.टंचाईत पडली भर४यावर्षी परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ऊन वाढत चालल्याने भूजल पातळीही मोठ्या प्रमाणात खोल जात आहे. परिणामी पाण्यासाठी भटकंती होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई