शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील घटना:कृषी विभागाच्या गोदामाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:30 IST

येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात असलेल्या पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या गोदामाला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास समोर आली. दरम्यान, अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच काही वेळातच अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात असलेल्या पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या गोदामाला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास समोर आली. दरम्यान, अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच काही वेळातच अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात पंचायत समितीचे चार गोदाम आहेत. मागील काही महिन्यांपासून हे चारही गोदाम बंद अवस्थेत आहेत. शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गोदामातून धूर येत असल्याचे काही जणांच्या लक्षात आले. ही माहिती अग्नीशमन विभागाला दिल्यानंतर अग्नीशमन अधिकाºयांनी ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, मागील अनेक महिन्यांपासून गोदाम बंद अवस्थेत असून, या गोदामात कृषी विभागाचे भंगार साहित्य, काही शेगड्या, हातपंपांचे पाईप व इतर साहित्य गोदामात होते. हे साहित्य जळून खाक झाले. पंचायत समितीच्या कृषी विभागाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता या ठिकाणी दाखल झाले होते. आगीत झालेल्या नुकसानीची माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, येथील गोदामपालाची सहा महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. तेव्हापासून या ठिकाणी गोदामपाल कार्यरत नसल्याने गोदाम बंद अवस्थेत होते. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकले नाही.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात चार गोदाम आहेत. मागील काही दिवसांपासून ते बंद आहेत. या गोदामात कृषी विभागाच्या बंद पडलेल्या योजनांचे साहित्य असावे.कृषी विभागाचे अधिकारी याची माहिती घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनाही कळविण्यात आले आहे. माहिती एकत्रित झाल्यास घटनेची रितसर पोलीस ठाण्यात नोंद केली जाईल, असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीfireआग