शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आॅनलाईन औषध विक्रीच्या निर्बंधाची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:58 IST

आॅनलाईन औषधी विक्रीला निर्बंध घालण्याचे निर्देश दिल्ली येथील उच्च न्यायालयाने दिले असून या निर्देशांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी परभणी जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केली असून याबाबत अन्न व औषधी प्रशासनाला निवेदन दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आॅनलाईन औषधी विक्रीला निर्बंध घालण्याचे निर्देश दिल्ली येथील उच्च न्यायालयाने दिले असून या निर्देशांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी परभणी जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केली असून याबाबत अन्न व औषधी प्रशासनाला निवेदन दिले आहे.डॉ.जहीर अहमद यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत १२ डिसेंबर २०१८ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. तसेच ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडियाचे डॉ.व्ही.जी.सोमाणी यांनी २८ नोव्हेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. आॅनलाईन औषध विक्रीमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके आणि जनसामान्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत अनेक वेळा प्रशासनाला निवेदने देऊनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही. औषधी व्यवसाय हा विशिष्ट कायद्यांतर्गत व फार्मसी शिक्षण घेतलेल्या रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या देखरेखीखाली होणे गरजेचे असताना औषधींची आॅनलाईन विक्री सर्रास होत आहे. या विरोधात तक्रारी करुनही प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही. आता न्यायालयाच्या आदेशाचे पालन प्रशासनाने करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाने सहायक आयुक्त मरेवाड यांना निवेदन देण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव सूर्यकांत हाके, पवन झांजरी, अनिल हराळ, गणेश पद्मवार, सुनील अग्रवाल, सुनील जोशी, शिवा पुरी, गोकुळ दाड, विजय कुचेरिया आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीmedicineऔषधंonlineऑनलाइन