शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अंतेश्वरमधील अवैध वाळूसाठा केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:14 IST

तालुक्यातील रहाटी शिवारातील गोदावरीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून लोहा तालुक्यातील अंतेश्वर परिसरात साठा केलेली वाळू महसूल पथकाने जप्त करून उचलली आहे. ही वाळू घरकूलाच्या कामासाठी लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील रहाटी शिवारातील गोदावरीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून लोहा तालुक्यातील अंतेश्वर परिसरात साठा केलेली वाळू महसूल पथकाने जप्त करून उचलली आहे. ही वाळू घरकूलाच्या कामासाठी लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे.पालम तालुक्यात गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडल्याने वाळूचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी महसूल विभागाकडून विविध उपाय करण्यात येत आहे. मागील आठ दिवसांपासून गोदावरीच्या काठावरील अवैध वाळूचे साठे पथकाकडून जप्त करण्यात येत आहेत.महसूलच्या पथकाची नजर चुकविण्यासाठी तालुक्यातील रहाटीच्या शिवारातून गोदावरी नदीच्या पात्रातील वाळू लोहा तालुक्यातील अंतेश्वर परिसरात साठविण्यात आली होती. याची पाहणी करून महसूलच्या पथकाने २५० ब्रास वाळू जप्त करून उचललेली आहे.ही वाळू तालुक्यातील पंचायत समितीच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या घरकुलाच्या बांधकामासाठी घरकूल लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. मागील तीन दिवसांपासून या वाळूचे वाटप सुरू आहे.तहसील कार्यालयातील पथकाने ही कारवाई केली आहे. या पथकात तहसीलदार स्वरूप कंकाळ, नायब तहसीलदार श्रीरंग कदम, मंडळाधिकारी के पी शिंदे, तलाठी विजय राठोड, सचिन सरोदे आदींचा समावेश आहे.पथक दाखल होताच: वाळू चोरांनी केले पलायन४वाळूची चोरी पकडण्यासाठी महसूल विभागाकडून पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे पथक दिवसा व रात्री गोदावरीच्या काठावरील गावांना अचानक भेटी देऊन कारवाई करीत आहे. नायब तहसीलदार श्रीरंग कदम व तलाठी देसाई यांनी १२ जून रोजी दुपारच्या सुमारास रावराजुर व खुर्लेवाडी येथील वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणांना भेट दिली.४पथकाला पाहताच वाळू चोरांनी आजूबाजूच्या परिसरात धूम ठोकली. याठिकाणी अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यात आल्याने मोठमोठे खड्डे पडले असून वाळूची चोरी प्रचंड प्रमाणात झाल्याचे पथकाला पहावयास मिळाले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, असे मत नदीकाठावरील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग