शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: अवैध वाळूउपसा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:16 IST

जिंतूर तालुक्यातील वझर, अंबरवाडी व किन्ही या तीन ठिकाणच्या पूर्णा नदीपात्रातून वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा सुरूच ठेवला आहे. महसूल विभागाच्या वतीने करण्यात येणारी कार्यवाही तोडकी ठरत असल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबामणी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील वझर, अंबरवाडी व किन्ही या तीन ठिकाणच्या पूर्णा नदीपात्रातून वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा सुरूच ठेवला आहे. महसूल विभागाच्या वतीने करण्यात येणारी कार्यवाही तोडकी ठरत असल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढत असल्याचे दिसून येत आहे.जिंतूर तालुक्यातील बामणी परिसरातील वझूर, अंबरवाडी व किन्ही या तीन ठिकाणाहून पूर्णा नदी वाहते. या नदीपात्रातील वाळू चांगल्या प्रतीची असल्याने या वाळूला जिल्ह्यासह परजिल्ह्यात मोठी मागणी आहे; परंतु, या ठिकाणच्या वाळू घाटाचे लिलाव अद्याप तालुका प्रशासनाकडून करण्यात आले नाहीत; परंतु, वाळू माफियांनी जिंंतूर तालुक्यातील वझूर, अंबरवाडी व किन्ही या तीन ठिकाणी आपले पॉईंट तयार केले आहेत. येथून रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, हायवा व ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळुची वाहतूक केली जाते. ही वाळू जिंतूर, मंठा, चारठाणा, सेलू, सेनगाव यासह अन्य ठिकाणी पोहचिती केल्या जाते. वझर या ठिकाणी तर महसूल पथकाचा अधिकारी किंवा कर्मचारी फिरकत नसल्याने बिनधास्तपणे वाळुचा उपसा करून अव्वाच्या सव्वा दराने विक्री केल्या जात असल्याचे समोर आले आहे. महसूलचे पथक कार्यवाही करण्याच्या उद्देशाने निघाले तर पथक पोहचण्याअधीच वाळू माफियांनी खबर लागते व तेथून हे माफिया पोबारा होतात. या वाळू विक्रीतून मोठा पैसा मिळत असल्याने व कार्यवाहीची भिती राहिली नसल्याने वाळू माफियांनी अंबरवाडी येथे नवीन पॉर्इंट सुरू केला आहे. विशेष म्हणजे, तीन महिन्यापूर्वी तहसीलदारांनी तीन ट्रॅक्टरवर कार्यवाही केली होती. मात्र तहसीलदारांची कार्यवाही तोडकी पडल्यानेच बेसुमार वाळूचा उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे. वझर येथे काही दिवसांपूर्वी वाळू माफियांवर कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकांवरही या माफियांनी हल्ला केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी येथील अवैध वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू