शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: अवैध वाळू उपशाने नदीपात्र पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:27 IST

मागील काही दिवसांपासून तालुक्यातील गोदावरीसह छोट्या-मोठ्या नद्यांमधून अवैध वाळू तस्करी जोरात सुरू आहे. तालुक्यातील वाणीसंगम, मोहळा, खडका, पोंहडूळ या ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याने नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी ग्रामस्थांना भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : मागील काही दिवसांपासून तालुक्यातील गोदावरीसह छोट्या-मोठ्या नद्यांमधून अवैध वाळू तस्करी जोरात सुरू आहे. तालुक्यातील वाणीसंगम, मोहळा, खडका, पोंहडूळ या ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याने नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी ग्रामस्थांना भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहेकाही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी सोनपेठ तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यात काही धाडसी कारवाया केल्या होत्या. या कार्यवाहीमुळे काही प्रमाणात वाळू माफियांचे धाबे दणाणले होते. मात्र काही दिवसानंंतर अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांनी तालुक्यातील वाणीसंगम, मोहळा, खडका व पोहंडूळ येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू केला आहे. रात्रीच्या वेळी हे वाळू तस्कर अंबाजोगाई, लातूर, उस्मानाबाद, बीड, परळी या ठिकाणी अवैध वाळू विक्री करीत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून वाळुची मागणी वाढली आहे. जिल्हा प्रशासनाकडून वाळू घाटांचे लिलाव होत नसल्याने वाळू माफियांनी संधीचे सोने करण्यासाठी तालुक्यातील वाणीसंगम येथील नदीपात्रातून रात्र-दिवस वाळूचा उपसा सुरू केला आहे. नदीपात्रातून उपसलेल्या वाळुचे इतरत्र ठिकाणी मोठमोठे साठे निर्माण केले आहेत. पावसाळ्यात वाळूला असलेली मागणी लक्षात घेऊन वाळू माफिया सक्रिय झाले असून तालुक्यातील वाणीसंगम, मोहळा, खडका, पोहंडूळ या ठिकाणच्या नदीपात्रातून रात्रं-दिवस बेसुमार वाळू उपसा सुरू केल्याने गोदावरीच्या पात्रात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्याच बरोबर वाळू उपशाने नदीपात्राची चाळणी झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही आगामी काळात अवैध वाळू उपशामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याच बरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यवाहीने वाळूमाफियांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे वाळू चोरीला चाप बसला होता. मात्र तालुका महसूल प्रशासनाकडून आता केवळ वाळू माफियांविरुद्ध बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे.माफियांची अधिकाºयांवर पाळतसोनपेठ तालुक्यातील पाच ते सहा गावांतील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत आहे. वाळूमाफिया महसूलच्या अधिकारी व कर्मचाºयांवर मोबाईलच्या सहाय्याने पाळत ठेवत आहेत. वाणीसंगमकडे जाणाºया रस्त्यांवर काही माफियांनी रोजंदारीवर माणसेही नेमली आहेत. महसूल प्रशासनातील अधिकारी नदीपात्राकडे किंवा गावामध्ये येण्याची चाहूल लागताच माफियांना मोबाईलद्वारे माहिती देत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे.सोनपेठ तालुक्यातील नदीपात्रातून होणाºया अवैध वाळू उपशावर जिल्हाधिकाºयांनी अंकुश ठेवला होता; परंतु, महसूल प्रशासनाकडून होणारी कारवाई थातूरमातूर असल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाकडून होणाºया कारवाईची धार वाढवावी, अशी मागणी वाणीसंगम येथील ग्रामस्थांमधून सातत्याने केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू