शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 19:43 IST

केवळ गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे होत असून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले जात नसल्याने हा दुजाभाव का? असा सवाल शेतकर्‍यांमधून केला जात आहे. 

परभणी : आठ दिवसांंपूर्वी अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिके आडवी झाली. प्रशासनाने या पिकांचे पंचनामे सुरू केले खरे. मात्र केवळ गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे होत असून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले जात नसल्याने हा दुजाभाव का? असा सवाल शेतकर्‍यांमधून केला जात आहे. 

मागील आठवड्यात ११, १२ व १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. त्यात जिंतूर, सेलू, पूर्णा, पालम आणि गंगाखेड तालुक्यामध्ये गारपीट झाली. तर परभणी तालुक्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नोंद महसूलच्या अधिकार्‍यांनी घेतली आहे.  दुसरीकडे अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यामुळे झालेल्या नुकसानीकडे चक्क कानाडोळा करण्यात आला आहे. परभणी तालुक्यात गारपीट व वादळी वार्‍याने रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, महसूल प्रशासनाने ज्या ठिकाणी गारपीट झाली आहे त्या ठिकाणचेच पंचनामे केले आहेत. 

मात्र वादळी वार्‍याने तालुक्यातील आर्वी, टाकळी कुंभकर्ण, शहापूर, तुळजापूर, कुंभारी बाजार, डिग्रस, मांडवा, कारला, काष्टगाव आदी गावातील गहू, ज्वारी ही पिके भूईसपाट झाली आहे. मात्र महसूल प्रशासनाने या पिकांचे अद्याप पंचनामे केले नाहीत. मोठा खर्च करून रबी हंगामात पेरणी केलेल्या शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास वादळी वार्‍याने हिरावून घेतला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने वार्‍याने भूईसपाट झालेल्या पिकांचेही पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

हे पिकांचे नुकसान नव्हे का?जिल्ह्यात सलग तीन दिवस वादळी वार्‍यांसह पाऊस झाला. जोराने आलेल्या वार्‍यामुळे उभी पिके आडवी झाली. त्यात अवकाळी पाऊस पडल्याने या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे या पिकांचेही पंचनामे करणे अपेक्षित असताना ते केले जात नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. आडवे झालेल्या पिकांचे नुकसान नव्हे काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी