शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तंत्रज्ञानाचा वापर नियोजनबद्ध केल्यास फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 01:19 IST

कमी खर्चाचे तंत्रज्ञान, मानवी व जमिनीचे आरोग्य राखणे आणि उत्पादनातील स्थिरता कायम ठेवण्यासाठी सेंद्रीय शेती आशेचा किरण आहे़ या शेतीमध्ये योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांचा फायदा होवू शकतो, असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ डी़एऩ गोखले यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कमी खर्चाचे तंत्रज्ञान, मानवी व जमिनीचे आरोग्य राखणे आणि उत्पादनातील स्थिरता कायम ठेवण्यासाठी सेंद्रीय शेती आशेचा किरण आहे़ या शेतीमध्ये योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांचा फायदा होवू शकतो, असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ डी़एऩ गोखले यांनी केले़वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ़ गोखले बोलत होते़ यावेळी मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे डॉ़ सय्यद इस्माईल, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य शरद हिवाळे, डॉ़ स्मिता सोळंके, पुणे येथील संजय देशमुख, डॉ़ सतीश भोंडे, महेश सोनकुळ, डॉ़ आनंद गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़ गोखले म्हणाले, शेतीमध्ये अनेक अडचणी आहेत़ त्यात कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक आणि बाजारभावातील चढउतार या प्रमुख समस्या आहेत़ शेतकºयांनी योग्य बियाणे, अंतरपीक पद्धती, पिकांची फेरपालट या मूलभूत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, युवा शेतकºयांनी शेतीमध्ये पुढे यावे, त्यांच्यातील उर्जा व ज्ञानाचा उपयोग शेती क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरेल़ विशेष म्हणजे सेंद्रीय शेतीमध्ये बाजार व्यवस्थापन महत्त्वाचे असून, बाजारपेठेचा अभ्यास करून सेंद्रीय शेतीत यश मिळविता येते, असे त्यांनी सांगितले़दिवसभराच्या तांत्रिक सत्रामध्ये पुणे येथील संजय देशमुख यांनी सेंद्रीय शेतीमधील प्रमाणीकरण, महेश सोनकूळ यांनी सेंद्रीय शेतीमध्ये परोपजीवी कीटकांचे व सापळ्यांचे फायदे, डॉ़ सतीश भोंडे यांनी माती परीक्षणाचे महत्त्व, डॉ़ सी़व्ही़ आंबडकर यांनी जैविक रोग व्यवस्थापन, डॉ़ ए़टी़ शिंदे यांनी पशूधन व्यवस्थापन आणि डॉ़ ए़एल़ धमक यांनी जैविक खताची निर्मिती, उपयोग आदीविषयी माहिती दिली़ यावेळी जैविक खत निर्मिती केंद्रास भेट देऊन प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले़ मनीषा वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले़ अभिजीत कदम यांनी आभार मानले़कार्यक्रम यशस्वीतेसाठी संशोधन संचालक डॉ़ दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रल्हाद गायकवाड, डॉ़ सुनील जावळे, शीतल उफाडे, द्वारका काळे, बाळू धारबळे, प्रसाद वसमतकर, सतीश कटारे, भागवत वाघ आदींनी प्रयत्न केले़एकत्र काम केल्यास खर्चात बचत४सेंद्रीय शेतीमध्ये प्रमाणीकरणास महत्त्व असून, त्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन काम केल्यास खर्चात बचत होईल, असे सांगून सेंद्रीय शेतीचे तंत्रज्ञान शेतकºयांना सांगितले़ डॉ़ सय्यद इस्माईल म्हणाले, रासायनिक खते व कीटक नाशकांच्या वापराचा अतिरेक झाल्याने मानवी आरोग्यावर परिणाम होतो़ तसेच जमिनीचे आरोग्यही बिघडते़ यामुळे दुहेरी नुकसान होते़ सेंद्रीय शेतीमध्ये निविष्ठांवरील खर्च कमी करता येतो, असे सांगून नेमक्या कोणत्या निविष्ठा वापराव्यात आणि कोणत्या नाही, याची माहिती त्यांनी दिली़ मराठवाडा विभागात सेंद्रीय शेतीचा प्रचार, प्रसार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी