शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

परभणी : मनमानी भाडे आकारल्यास बस परवाना निलंबित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:49 IST

खाजगी बसचालकांनी हंगामाच्या नावाखाली मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारल्यास त्यांचा वाहन परवाना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असून तक्रारीनंतर विभागाने तीन बसचा परवाना निलंबित केला असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खाजगी बसचालकांनी हंगामाच्या नावाखाली मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारल्यास त्यांचा वाहन परवाना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असून तक्रारीनंतर विभागाने तीन बसचा परवाना निलंबित केला असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत दिली.खाजगी बस वाहतूकदरांकडून उन्हाळ्याच्या सुट्या, दिवाळी आदी हंगामात प्रवासी तिकीटाचे दर दुप्पट आकारुन प्रवाशांची लूट केली जात असल्यासंदर्भात विधान परिषदेत नुकताच तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार या तारांकित प्रश्नावर लेखी उत्तर देताना परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले की, शासनाने २७ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे खाजगी कंत्राटी वाहनांच्या कमाल भाडेदर निश्चिती संदर्भात निर्णय घेतला असून खाजगी बसचालकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या ५० टक्केपेक्षा अधिक भाडे दर आकारता येत नाही. खाजगी बसचालकांकडून जादा भाडे दर आकारल्याबाबतच्या या विभागाकडे आजतागायत एकूण ७९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६ तक्रारी चौकशीअंती जादा भाडे आकारल्याच्या आढळून आले आहे. यामध्ये ३ बसेसचा परवाना निलंबित करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत. तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय वसई यांनी एका प्रकरणात ४ हजार रुपये तसेच कोल्हापूर येथील कार्यालयाने एका प्रकरणात ५ हजार ४०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजीच्या निर्णयानुसार कंत्राटी प्रवासी वाहनांची कमाल भाडे दर निश्चिती करुन खाजगी बस प्रचालकांकडून जादा भाडेवाढ रोखण्यासाठी खाजगी कंत्राटी वाहनांच्या बुकिंगच्या जागी भेट देण्याचे व कारवाई करण्याबाबतचे तसेच खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात, त्या ठिकाणापासूनचे कि.मी. प्रमाणे खाजगी बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाडे दराबाबत विहित नमुन्यात तक्ता तयार करावा. त्या प्रमाणे येणारा प्रति आसन दर दर्शवून खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात, अशा ठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यासंदर्भातील आदेश सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांच्या सोयीकरीता हेल्पलाईन क्रमांक ०२२-६२४२६६६६ व ६६६.३१ंल्ल२स्रङ्म१३.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५ या संकेतस्थळावर जादा भाडे दरासंदर्भात तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे रावते म्हणाले.परभणी : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कायम४खाजगी बस चालकांच्या मनमानी प्रवासी भाडेवाढीला राज्य शासनाने लगाम लावला असला तरी त्याची अंमलबजावणी मात्र परभणी जिल्ह्यात होत नसल्याचे दिसून आले आहे. शहरातील रेल्वे स्टेशनसमोर खाजगी प्रवासी बस उभ्या असतात. येथे कोणत्याही प्रकारचा बोर्ड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने लावलेला नाही.४ दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात काही खाजगी बस चालकांनी दुप्पटीपेक्षा अधिक प्रवासी भाडे आकारले. त्या माध्यमातून प्रवाशांची लूट झाली; परंतु, अशा एकाही खाजगी बसचालकावर परभणीतील अधिकाºयांनी कारवाई केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्णयाकडे परभणीतील अधिकारी साफ दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.बस तपासणीला खो४एस.टी. महामंडळासह खाजगी प्रवासी वाहतूक करणाºया कालबाह्य झालेल्या अनेक बस शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांवरुन दररोज धावत आहेत; परंतु, या बसची तपासणी करण्याची तसदी परिवहन विभागाकडून घेण्यात आलेली नाही. परिणामी या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTravel Tipsट्रॅव्हल टिप्सstate transportएसटी