शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:कापसाला ६ हजार १४० रुपयांचा उच्चांकी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:47 IST

यंदाच्या कापूस हंगामातील सर्वात उच्चांकी ६ हजार १४० रुपयांचा भाव १ एप्रिल रोजी कापसाला मिळाला. यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. बाजार समितीच्या यार्डात कापसाची आवक सुरु असून, शेकडो वाहने घेऊन शेतकरी लिलावात येत असल्याचे चित्र बाजार समितीत दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : यंदाच्या कापूस हंगामातील सर्वात उच्चांकी ६ हजार १४० रुपयांचा भाव १ एप्रिल रोजी कापसाला मिळाला. यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. बाजार समितीच्या यार्डात कापसाची आवक सुरु असून, शेकडो वाहने घेऊन शेतकरी लिलावात येत असल्याचे चित्र बाजार समितीत दिसत आहे.यंदा कापूस जगविण्यासाठी अधिक झळ शेतकऱ्यांना बसली आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस वेचणीसाठी ८ ते १० ते दहा रुपये किलो प्रमाणे पैसे माजावे लागले होते. मात्र कापुस हंगाम २०१८ - १९ अंतर्गत आक्टोबर महिन्यात बाजार समितीच्या यार्डात लिलाव सुरु झाल्यानंतर लिलावात प्रत्यक्ष कापसाला हमीभावा पेक्षा जास्त भाव मिळाला. मधल्या काळात ५ हजार ४८० रुपयापर्यंत कापसाचे भाव खाली आले होते़ मात्र मागील आठवडा भरापासुन कापसाच्या भावात सतत वाढ होत असल्याने शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. १ एप्रिल रोजी कापसाला ६ हजार १४० रुपयांचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून आले़ परभणी, सोनपेठ, पाथरी तालुक्यासह मानवत तालुक्यातील शेतकरी कापूस विक्रीसाठी मानवत बाजारपेठ जवळ करीत आहेत़ खाजगी परवानाधारक खरेदीदारासह सीसीआयने १ एप्रिलपर्यंत ४ लाख क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी केल्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे. बाजारपेठेतील एकूण चित्र पाहाता सद्यस्थितीत कापसाचे दर वाढत असल्याने कापूस विक्री न करता घरात कापूस राखून ठेवलेल्या कापसाने शेतकºयांना तारले आहे़नगदी पैसे उपलब्ध करून द्या४मानवत येथील कापसाची बाजार पेठ रोख रक्कमेमुळे प्रसिद्ध आहे़ मात्र मार्च एंडमुळे बँकेतून रक्कम मिळत नसल्याने व्यापाºयांना धनादेशाद्वारे पेमंट द्यावे लागत आहे. ही अडचण सोडविण्यासाठी बँक अधिकाºयांकडे रोख रक्कम उपलब्ध करुन देण्याची मागणी केली असून, तीन ते चार दिवसात बँकांकडून व्यापाºयांना रोख रक्कम उपलब्ध होणार आहे़ रोख रक्कम मिळाल्यास शेतकºयाना धनादेश न देता रोखीने व्यवहार करणे सोपे जाईल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती गंगाधरराव कदम यांनी दिली़तीन दिवस होता लिलाव बंद४मार्चएंडमुळे तीन दिवस लिलाव बंद ठेवल्यानंतर १ एप्रिल रोजी कापूस लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आला़४या लिलावात गिरीष कत्रुवार, विजय पोरवाल, युनुस मिलनवाले, भगवान गोलाईत, संदिप पेन्सलवार, गौरव अग्रवाल, रामनिवास टवानी, रामनिवास सारडा, जुगल काबरा, राहुल कडतन आदी खरेदीदार सहभागी झाले होते़

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी