शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: मानवतमध्ये जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:58 IST

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास मानवत शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे़ अर्धा तास झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास मानवत शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे़ अर्धा तास झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे़जिल्ह्यात दमदार पाऊस होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत़ अनेकांच्या पेरण्या रखडल्या असून, ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे़ त्यामुळे पावसाची प्रतीक्षा लागली आहे़ रविवारी जिल्हाभरात ढगाळ वातावरण होते़; परंतु, काही भागांतच पाऊस झाला आहे़मानवत तालुक्यात सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली़ संपूर्ण तालुका परिसरात अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला़ या पावसामुळे शहरी भागात रस्त्यावर पाणी साचले होते़ या पावसामुळे जमिनीत बºयापैकी ओल निर्माण होण्यास मदत होणार आहे़परभणी शहर आणि परिसरातही रविवारी पावसाने हजेरी लावली़ सायंकाळी ४़३० वाजेच्या सुमारास १० ते १५ मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ गंगाखेड तालुक्यात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे़ इतर तालुक्यांत मात्र पावसाने हुलकावणी दिली़परभणीत सरासरी२.७८ मि.मी. पाऊसपरभणी : रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २.७८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पाऊस गायब असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जुलै महिना सुरू झाला तरी पेरणी योग्य पाऊस झाला नाही.४शनिवारी रात्री काही भागात हलका पाऊस झाला. रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार मानवत तालुक्यात सर्वाधिक ६.३३ मि.मी., परभणी तालुक्यात ५.७३ मि.मी., पालम ०.३३, पूर्णा ४.२०, सेलू १.४०, पाथरी ५ आणि जिंतूर तालुक्यात २ मि.मी. पाऊस झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ९१.१७ मि.मी. पाऊस झाला आहे. गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक १२१.२५ मि.मी., सोनपेठ तालुक्यात ११५.५० मि.मी., मानवत ११५ मि.मी., पूर्णा ९९ मि.मी., जिंतूर ९३ मि.मी., पालम ९४ मि.मी., परभणी ८३.११ मि.मी., पाथरी ७३ मि.मी. आणि सेलू तालुक्यात ६०.४० मि.मी. पाऊस झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस