शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आरोग्य विभागाने झटकले हात, लसीकरणामुळे मृत्यू नसल्याचा व्यक्त केला अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:44 IST

पालम तालुक्यातील रोकडेवाडी येथे ७ नोव्हेंबर रोजी लसीकरणानंतर दोन बालकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आरोग्य विभागाने चार दिवसांनी खुलासा केला असून लसीकरणामुळे बालकांचा मृत्यू झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोग्य विभागाने हात झटकल्याचेच दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालम तालुक्यातील रोकडेवाडी येथे ७ नोव्हेंबर रोजी लसीकरणानंतर दोन बालकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आरोग्य विभागाने चार दिवसांनी खुलासा केला असून लसीकरणामुळे बालकांचा मृत्यू झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोग्य विभागाने हात झटकल्याचेच दिसत आहे.रोकडेवाडी येथे ६ नोव्हेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रावराजूर अंतर्गत लसीकरण करण्यात आले होते. लसीकरणानंतर दोन बालकांचा मृत्यू झाला असून या प्रकरणात आरोग्य विभागाने स्वतंत्र प्रसिद्धी पत्रक काढून हा मृत्यू लसीकरणामुळे झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. रोकडेवाडी येथील ज्या समूह क्रमांकाच्या लसी बालकांना देण्यात आल्या. त्याच समूह क्रमांकाच्या लसी इतर ७ गावांमध्येही दिल्या आहेत. तेथील बालकांची प्रकृती चांगली असल्याची खात्री आरोग्य विभागाने केली आहे. तसेच प्रत्येक लसीकरण सत्रापूर्वी मार्गदर्शक सूचनाचा अवलंब व काळजी घेतली जाते. तीच काळजी रोकडेवाडी येथेही घेण्यात आल्याचेही प्राथमिक चौकशीत दिसून आले, असेही जिल्हा माता बालसंगोपन अधिकाऱ्यांनी या पत्रकात म्हटले आहे. त्याचप्रमाणे रोकडेवाडी येथील बालके कोणत्या कारणांमुळे दगावली, याबाबत शवविच्छेदन अहवाल, जागतिक आरोग्य संघटना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेषज्ञ आदींची समिती सखोल चौकशी करीत असल्याचेही स्पष्ट केले आहे. परंतु, या चौकशीपूर्वीच बालकांचा मृत्यू लसीकरणाने झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला.शिवाय लसीकरणासाठी बालकाचे वजन किमान अडीच किलो असणे आवश्यक आहे. दगावलेल्या बालकाचे वजन अडीच किलोपेक्षा कमी होते, याबाबत मात्र कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यू