शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:37 IST

पोलिसांनी शहरात जप्त केलेल्या १८ लाख रुपयांच्या गुटख्या प्रकरणी घरमालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : पोलिसांनी शहरात जप्त केलेल्या १८ लाख रुपयांच्या गुटख्या प्रकरणी घरमालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे यांच्या पथकाने बाबुशा गवते यांच्या घरावर धाड टाकली. या धाडीमध्ये आरएमडी, गोवा, राजनिवास व विमल गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रकाश कच्छवे यांनी २० सप्टेंबर रोजी जप्त केलेल्या गुटख्याचा पंचनामा करुन मोजणी केली असता १८ लाख ६ हजार ७०० रुपयांचा गुटखा असल्याचे निष्पन्न झाले.प्रकाश कच्छवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुटखा विक्रेते निखील हिरामन तमखाने (रा.तमखाने गल्ली, गंगाखेड), अमोल सुभाष बडवणे (रा.देवळे जिनिंग गंगाखेड) व घरमालक बाबुशा गवते (रा.तमखाने गल्ली) या तिघांविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके हे करीत आहेत.झोला येथे युवकाचा मृत्यू४गंगाखेड- अति दारु सेवण केल्याने ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील झोला येथे घडली. तालुक्यातील झोला येथील महेश दत्तात्रय ढाकणे (३०) या युवकाने अति दारु सेवण केल्याने तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्यास गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.४यावेळी उपस्थित डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी २० सप्टेंबर रोजी मयत महेश ढाकणे यांचे वडील दत्तात्रय मुगाजी ढाकणे यांनी दिलेल्या माहितीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार सुरेश पाटील हे करीत आहेत.सोनपेठ शहरात दोन दुकाने फोडली४सोनपेठ- शहरातील परळी रस्त्यावरील दोन दुकानांचे शटर वाकवून चोरी केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. शहरातील परळी रस्त्यावरील इनामदार कॉलनी येथील राजेभाऊ कराड हे १९ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन घरी गेले. त्यानंतर २० सप्टेंबर रोजी शेजारील व्यक्तीच्या लक्षात ही घटना आल्यानंतर दुकानाचे शटर वाकवून चोरी झाल्याचे दुकानमालक कराड यांना सांगितले.४त्यानंतर पाहणी केली असता दुकानातील १५ हजार ५०० रोख व किराणा सामान असा २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे, अशी फिर्याद राजेभाऊ कराड यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार अनिल शिंदे हे करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी