शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

परभणी : जांभुळबेट रस्त्यासाठी ४ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:04 IST

तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या जांभूळबेटाला जाणारा रस्ता व लेंडी नदीच्या पात्रात नवीन पुलाच्या कामासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या जांभूळबेटाला जाणारा रस्ता व लेंडी नदीच्या पात्रात नवीन पुलाच्या कामासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.परभणी जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारे हे बेट मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होते. जांभूळबेटाकडे जाणारा रस्ता खराब झाल्याने पर्यटकांनी बेटाकडे पाठ फिरवली होती. जांभुळबेट रस्त्यावर ३ कि.मी. पर्यंतचा रस्ता करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित २.५ कि.मी. रस्ता हा अजूनही ‘जैसे थे’ असून या कामासाठी आता प्रादेशिक पर्यटन निधी अंतर्गत २ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आ.डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी यासाठी पुढाकार घेतला. याच रस्त्यावरील पालम शहरापासून अर्धा कि.मी. अंतरावरील लेंडी नदीच्या पात्रात जुना पूल असल्याने ७ गावांचा पावसाळ्यात ८-८ दिवस नेहमीच संपर्क तुटत होता. या निधीतून पुलाचे काम मार्गी लागणार आहे. पुलाच्या कामासाठी १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे जांभूळबेटाकडे जाणाऱ्या पर्यटकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. रस्ता व पुलाच्या कामाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम उपविभागाने तयार करून पुढील कार्यवाईसाठी वरिष्ठाकडे पाठवले आहेत.लेंडी नदीचा प्रश्न लागला मार्गीजांभूळबेटाकडे जाणाºया रस्त्यावर लेंडी नदीवरील पुलाची उंची कमी असल्यामुळे थोडाही पाऊस झाला तरी या मार्गावरील वाहतूक बंद होत होती़ त्यामुळे पर्यटकांस ग्रामस्थांची गैरसोय होत होती.या पुलाच्या कामासाठी १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ त्यामुळे या पुलाचे काम मार्गी लागणार असून, पुलाची उंची वाढल्यास परिसरातील ५ गावांचा प्रश्न निकाली निघणार आहे.काम दर्जेदार होण्याची गरजजांभूळबेटाकडे जाणाºया रस्ते व पुलाच्या कामासाठी ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे़ परंतु, ही कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी