शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

परभणी : शासकीय विश्रामगृह पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:46 IST

शहरातील शनिवार बाजार परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली असून दोन वर्षांपासून हे विश्रामगृह बंद असल्याने सध्या ते ओस पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील शनिवार बाजार परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली असून दोन वर्षांपासून हे विश्रामगृह बंद असल्याने सध्या ते ओस पडले आहे.परभणी शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित शनिवार बाजार येथील निजामकालीन विश्रामगृह तसेच वसमतरोडवरील नव्याने बांधकाम झालेले सावली विश्रामगृह अशा दोन विश्रामगृहांचा समावेश आहे. त्यापैकी शनिवार बाजारातील विश्रामगृहाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दोन वर्षांपासून या विश्रामगृहाचा वापरही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे अधिकारी, पदाधिकारी आणि इतर पाहुणे मंडळींना सावली विश्रामगृहामध्येच निवारा द्यावा लागत आहे. परभणी शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते.प्रत्येक महिन्यात अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतात. त्यामुळे पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यांमधून परभणीत कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शनिवार बाजारातील विश्रामगृह बंद पडल्याने अनेक वेळा बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची खाजगी हॉटेलमध्ये व्यवस्था करावी लागते.शनिवार बाजार भागातील शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम निजामकालीन आहे. शहरामध्ये सावली विश्रामगृहाची उभारणी झाल्यानंतर जुन्या विश्रामगृहाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. परिणामी या विश्रामगृहाच्या दुरवस्थेत दिवसेंदिवस भर पडली. सध्या या विश्रामगृहाची इमारत मोडकळीस आली आहे.समोरील बाजुने आरसीसी बांधकाम असले तरी पाठीमागील बाजू जुन्या बांधकामाची आहे. विश्रामगृहातील खोल्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. प्रकाश व्यवस्थेची वायरिंग जागोजागी उखडली असून फर्निचरची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. त्यामुळे दोन वर्षापासून या विश्रामगृहाचा वापर बंद करण्यात आला आहे. एैसपैस जागा आणि सुविधा असतानाही शहराच्या मध्यवस्तीत असलेले हे विश्रामगृह ओस पडले आहे.बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन विश्रामगृहाची दुरुस्ती करुन ते वापरण्यायोग्य करावे, अशी मागणी होत आहे.दुसºया फळीतील कार्यकर्त्यांची गोची४सावली विश्रामगृहामध्ये अति महत्त्वांच्या व्यक्तींसाठी निवासाची व्यवस्था केली जाते. याशिवाय या ठिकाणी सर्वसाधारण कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसाठी चार कक्ष उपलब्ध आहेत. मात्र ते अपुरे पडतात. अनेक वेळा बाहेरगावाहून येणाºया अति महत्त्वाच्या व्यक्तींसोबत येणाºया इतर व्यक्तींची निवासाची व्यवस्था होत नाही. अशा दुसºया फळीतील पाहुण्यांसाठी शनिवार बाजारातील विश्रामगृह सोयीचे ठरत होते. मात्र या विश्रामगृहाचीच दुरवस्था झाल्याने गैरसोयीत भर पडली आहे.इमारत पाडण्याची मागितली परवानगीशनिवार बाजारातील सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील शासकीय विश्रामगृहाची इमारत जुनी झाल्याने ती पाडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी साबां उपविभागाने केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अभियंत्यांना २१ सप्टेंबर २०१६ रोजी पत्र पाठवून निजामकालीन असलेल्या या इमारतीचा वापर बंद ठेवावा, असे सूचित केले आहे. तेव्हापासून हे विश्रामगृह बंद अवस्थेत आहे.निवास खोल्या कुलूपबंद अवस्थेतशासकीय विश्रामगृहाच्या परिसरात काही निवासी खोल्याही उपलब्ध आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून या खोल्यांचा वापर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार बाजारातील शासकीय विश्रामगृह केवळ नावापुरतेच शिल्लक राहिले असून कधीकाळी अति महत्त्वाच्या व्यक्तींचे निवासस्थान असलेली ही वास्तू सध्या मात्र भनान अवस्थेत उभी आहे.गार्डनचीही दुरवस्था४येथील शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये काही वर्षांपूर्वी गार्डन विकसित केले होते. झाडे लावून विश्रामगृह परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले. सध्या मात्र या गार्डनची दुरवस्था झाली आहे. परिसरातील लॉन पूर्णत: वाळून गेली असून काही झाडेही वाळली आहेत. गार्डनच्या सुशोभिकरणाकडेच बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. किमान या भागातील गार्डनची निगा राखली असती तर हा परिसर आणखी आकर्षक दिसला असता. तेव्हा किमान गार्डनचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी