शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १२१ पीडित मुलींचे मनोधैर्य वाढविण्यास शासनाचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:10 IST

मनोधैर्य योजनेंतर्गत महिला व बालविकास कार्यालयाकडे पाच वर्षांत १९० प्रस्ताव दाखल झाले होते़ त्यापैकी कार्यालयाच्या वतीने १३४ प्रस्तावांना मंजुरी देऊन १२१ पीडित मुलींना अर्थसहाय्य करण्यात आले़ तर कागदपत्रांची पूर्तता न करणारे १३ प्रस्ताव कार्यालयाकडे पडून आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मनोधैर्य योजनेंतर्गत महिला व बालविकास कार्यालयाकडे पाच वर्षांत १९० प्रस्ताव दाखल झाले होते़ त्यापैकी कार्यालयाच्या वतीने १३४ प्रस्तावांना मंजुरी देऊन १२१ पीडित मुलींना अर्थसहाय्य करण्यात आले़ तर कागदपत्रांची पूर्तता न करणारे १३ प्रस्ताव कार्यालयाकडे पडून आहेत़अत्याचार पीडित महिला, बालकांना आधार देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने २ आॅक्टोबर २०१३ पासून मनोधैर्य योजना सुरू केली़ या योजनेंतर्गत बलात्कार, बाल लैंगीक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला झालेल्या पीडित मुलींसाठी मनोधैर्य योजनेंतर्गत २ ते ३ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य करण्यात येते़ या कार्यालयाकडे २०१३ ते २०१७ पर्यंत १९० प्रस्ताव दाखल झाले होते़ त्यापैकी ५६ प्रस्ताव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन असलेल्या समितीच्या वतीने नामंजूर करण्यात आले़ त्यामुळे १९० प्रकरणांपैकी १३४ प्रकरणे मंजूर करण्यात आली़ १३४ पैकी १२१ प्रस्तावांना अर्थसहाय्य देण्यात आले़ यामध्ये २०१३ ते २०१४ या आर्थिक वर्षात बाल लैकींग अत्याचाराचे एक प्रकरण दाखल झाले होते़ हे प्रकरण मंजूर करून अर्थसहाय्य करण्यात आले़ २०१४-१५ या वर्षात बलात्कार, बाल लैंगीक अत्याचार असे एकूण ७५ प्रकरणे दाखल झाली होती़ त्यापैकी ४१ मंजूर करण्यात आली व त्यातील ४० प्रकरणांतील पीडितांना अर्थसहाय्य करण्यात आले़ तर एक प्रस्ताव कागदपत्रांतील त्रुटींमुळे प्रलंबित आहे़ २०१५-१६ या वर्षात ४६ प्रकरणे महिला व बालकल्याण कार्यालयाकडे दाखल झाले होते़ त्यापैकी ३२ मंजूर झाले़ त्यातील ३१ प्रकरणांतील पीडितांना कमीत कमी २ व जास्तीत जास्त ३ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात आले़ एक प्रस्ताव अपूर्ण असल्याने प्रलंबित आहे़ २०१६-१७ या आर्थिक वर्षांत ४० प्रस्ताव दाखल झाले होते़ त्यातील ३६ प्रस्तावांना मंजुरी देऊन ३१ पीडितांना अर्थसहाय्य करण्यात आले़ तर ५ प्रस्ताव पीडितांचा ठावठिकाणांचा न लागल्याने व कागदपत्रांत त्रुटी असल्याने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत़ जून २०१७ पर्यंत या विभागाकडे २८ प्रकरणे दाखल झाले होते़ त्यापैकी २४ प्रकरणे मंजूर करण्यात आली तर १८ प्रकरणांना अर्थसहाय्य करण्यात आले व सहा प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आले आहेत़२०१३ ते २०१७ या कालावधीत १२१ प्रकरणांतील पीडितांना २ कोटी ५६ लाख ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले असल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली़