शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

परभणी: खाजगी बसमधून माल वाहतूक करण्यास शासनाकडून बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:09 AM

खाजगी प्रवासी बसेसमधून माल वाहतूक करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली असून, अशा प्रकारे वाहतूक केल्याचे आढळून आल्यास परिवहन विभागातर्फे संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत एका प्रश्नावर लेखी स्वरुपात दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खाजगी प्रवासी बसेसमधून माल वाहतूक करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली असून, अशा प्रकारे वाहतूक केल्याचे आढळून आल्यास परिवहन विभागातर्फे संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत एका प्रश्नावर लेखी स्वरुपात दिली़परभणी जिल्ह्यातील खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक केली जात आहे़ या अनुषंगाने भाजपाचे आ़ प्रवीण दरेकर, शिवसेनेचे आ़ अनिल परब, आ़ मनिषा कायंदे, आ़ गिरीष व्यास, आ़ भाई गिरकर, आ़ नागोराव गाणार यांनी विधान परिषदेत या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता़ त्यावर बोलताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, खाजगी बसेसमधून माल वाहतूक करण्यास कायद्याने बंदी आहे़ अशा प्रकारची वाहतूक केल्याचे आढळल्यास परिवहन विभागातर्फे संबंधितावर कारवाई करण्यात यावी, असे आदेश शासनाने दिले आहेत़ परिवहन आयुक्त कार्यालयाने २२ जानेवारी २०१९ रोजी राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना खाजगी बसेसमधून होणाºया अवैध माल वाहतुकीविरूद्ध कारवाई करण्यासाठी २४ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवावी म्हणून निर्देश दिले होते़ त्या अनुषंगाने २ हजार ४०९ वाहनांची तपासणी करण्यात आली़ यामध्ये ३८८ वाहने दोषी आढळून आली असून, त्यांच्याकडून १६ लाख २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ११ वाहनांची अनुज्ञप्ती निलंबित करण्यात आली आहे़ तसेच २०१७-१८ ते मे २०१९ या कालावधीत खाजगी बसेसमधून होणाºया माल वाहतुकीविरूद्ध केलेल्य कारवाईत २५ हजार ४५२ वाहनांची तपासणी करण्यात आली़ यामध्ये १ हजार ७२९ वाहने दोषी आढळून आली असून, त्यापोटी ४३ लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला व १८० वाहनांची अनुज्ञेप्ती व १८३ परवाने निलंबित करण्यात आले आहे, असे परिवहन मंत्री रावते म्हणाले़परभणीत अंमलबजावणी होईना४परभणी शहरातील काही खाजगी प्रवासी बसमधून सर्रासपणे माल वाहतूक केली जात आहे़ विशेष म्हणजे भर रस्त्यावर अशी वाहने उभी करून वाहनांच्या डिक्कीमध्ये माल भरला जात असताना येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे़४परिणामी शासनाचा आदेश असतानाही त्याकडे काना डोळा केला जात असल्याने खाजगी प्रवासी बस चालकांचे फावत आहे़ त्यामुळे या प्रकरणी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स