शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गोदामपाल कांबळे निलंबित; तहसीलदारांना दिली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:24 IST

पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या ३३ लाख ७५ हजार ३०८ रुपयांच्या १२१८ क्विंटल धान्य घोटाळा प्रकरणात गोदामपाल एस.पी.कांबळे यांना निलंबित करण्यात आले असून प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या ३३ लाख ७५ हजार ३०८ रुपयांच्या १२१८ क्विंटल धान्य घोटाळा प्रकरणात गोदामपाल एस.पी.कांबळे यांना निलंबित करण्यात आले असून प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामाची गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी विश्वंभर गावंडे यांनी तपासणी केली असता त्यामध्ये १२६२.४१ क्विंटल धान्य कमी आढळून आले होते. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाºयांना अहवाल सादर केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी प्रभारी तहसीलदार तथा पुरवठा निरिक्षक श्रीरंग कदम यांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुन्हा एकदा गोदामातील धान्याची पडताळणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ७०८.३९ क्विंटल गहू, ५०९.१८ किलो तांदुळ, १.१५ क्विंटल तूर दाळ व ०.२४ किलो चनाडाळ असे एकूण १२१८ क्विंटल धान्य कमी आढळून आले होते. पुरवठा विभागाने निश्चित केलेल्या दरानुसार या धान्याची ३३ लाख ७५ हजार ३०८ रुपये किंमत होते.या किंमतीच्या रक्कमेच्या धान्याचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी शुक्रवारीच गोदामपाल एस.पी.कांबळे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. तर प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.गोदामपाल कांबळे यांच्याकडून अनेक दिवसांपासून गोदामातील धान्याचा अपहार टप्प्याटप्प्याने होत असताना या गोदामाची नियमित तपासणी करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे यासाठी कारणीभूत असलेल्या वरिष्ठ अधिकाºयांनाही निलंबित करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfraudधोकेबाजीTahasildarतहसीलदारcollectorजिल्हाधिकारी