शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गोंधळातच आटोपली सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:38 IST

जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रेडीरेकनरनुसार पीक कर्जाचे वाटप करावे, या मागणीवरुन शेतकरी आक्रमक झाल्याने गोंधळ निर्माण झाला. या गोंधळानंतरही बँक प्रशासन व संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची तसदी न घेताच सभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकरी सभासदांत संताप व्यक्त केला जात होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रेडीरेकनरनुसार पीक कर्जाचे वाटप करावे, या मागणीवरुन शेतकरी आक्रमक झाल्याने गोंधळ निर्माण झाला. या गोंधळानंतरही बँक प्रशासन व संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची तसदी न घेताच सभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकरी सभासदांत संताप व्यक्त केला जात होता.येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकी भवनात १४ आॅगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेस बँकेचे अध्यक्ष पंडितराव चोखट, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, आ़ तान्हाजी मुटकुळे, लक्ष्मणराव दुधाटे, बालाजी देसाई, विजयसिंह जामकर, हेमंतराव आडळकर, भगवान सानप यांच्यासह परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते़संचालक सुरेश वरपूडकर यांनी बँकेच्या ठेवी, उचल, कर्ज आदीची माहिती दिली़ त्यानंतर पीककर्जाचा विषय शेतकरी सभासदांनी उपस्थित केला. काही सभासदांनी नवीन पीक कर्ज वाटप करताना रेडीरेकननुसार वाटप करणार का, असा सवाल केला़ या प्रश्नावर संचालक मंडळ व बँक प्रशासन उत्तर देण्यास पुढे आले नाही़ त्यामुळे शेतकरी सभासदांनी गोंधळ सुरू केला़ त्यानंतर १० ते १५ मिनिटे हा गोंधळ सुरू होता़संचालक लक्ष्मणराव गोळेगावकर यांनी सभासदांना समजविण्याचा प्रयत्न केला़ मात्र गोंधळ थांबत नसल्याने ही सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज