शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ऊसाच्या प्रश्नावरुन गाजली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:43 IST

जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी नेण्याऐवजी कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणला जात असल्याचा आरोप परभणीतील नियोजन समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्यानंतर या संदर्भात साखर आयुक्तांसमवेत बैठक घेऊन नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी नेण्याऐवजी कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणला जात असल्याचा आरोप परभणीतील नियोजन समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्यानंतर या संदर्भात साखर आयुक्तांसमवेत बैठक घेऊन नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात रविवारी नियोजन समितीची बैठक सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खा.बंडू जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वलाताई राठोड, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, आयुक्त रमेश पवार, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांची उपस्थिती होती.सभा सुरु झाल्यानंतर खा.बंडू जाधव यांनी शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे यांनीही प्रश्न उपस्थित केले. जिल्ह्यातील कारखाने उसात राजकारण करीत आहेत. लिंबा कारखाना आणि गंगाखेड कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस नेण्याऐवजी माजलगाव, परळी येथून ऊस आणत आहेत. त्यामुळे स्थानिक ऊस उत्पादकांमध्ये तीव्र असंतोष आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकºयांचा ऊस वेळेत गाळप झाला नाही तर ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असे सांगितले. तसेच आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांनीही कारखाने एफआरपी प्रमाणे ऊस बिलाची रक्कम अदा करीत नसल्याचा मुद्दा मांडला. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साखर आयुक्तांसमवेत जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, कारखाना प्रशासनाची बैठक बोलवा. सुरुवातीला कार्यक्षेत्रातील १० कि.मी. अंतरातील ऊस नेण्याचे नियोजन करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. आ.विजय भांबळे यांनी पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेंतर्ग़त कामे होत नसल्याचे बैठकीत सांगितले. त्यावर या योजनेतून प्रस्ताव मंजूर झाले असून ही कामे लवकर सुरु करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.उसासाठी आचारसंहिता ठरवा - श्रीनिवास मुंडे४जिल्हा परिषदेचे कृषी सभापती श्रीनिवास मुंडे यांनीही उसाचा प्रश्न उपस्थित करीत कारखाने कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणत असल्याचे बैठकीत सांगितले. जिल्ह्यामध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तेव्हा या उसाचे गाळप वेळेत होण्यासाठी ठराविक आचारसंहिता निश्चित करावी, अशी मागणी श्रीनिवास मुंडे यांनी केली. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतील सिंचन विहिरीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषदेच्या निधीतून शौचालय बांधकामासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यास श्रीनिवास मुंडे यांच्यासह इतर सदस्यांनी विरोध केला.स्मारकासाठी निधी द्या -जोगदंड४जिल्ह्यातील शहीद जवानांच्या गावांमध्ये व्यायामशाळा, ग्रंथालय, अभ्यासिका उभारण्यासाठी नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी जि.प.सदस्य श्रीनिवास जोगदंड यांनी यावेळी केली. त्यास पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली.४जिल्ह्यामध्ये दुष्काळी उपाययोजना सुरु नसून त्या सुरू कराव्यात, पीक विम्याचे २५ टक्के प्रमाणे रक्कम वाटप करावी, पालकमंत्री पाणंद योजनेतील कामांची गती वाढविण्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून निधी देण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरी